गुढीपाडव्यानिमित्त आंब्याची पहिली पेटी आणली? पण आंबे नैसर्गिकरित्या पिकवले की नाही - कसे ओळखाल...
Updated:March 30, 2025 21:41 IST2025-03-30T21:28:48+5:302025-03-30T21:41:17+5:30
Tips & Tricks : How to know if mango is ripened with chemicals : How to identify if the mango is naturally or artificially ripened : This is how you can identify artificially ripened mangoes : आंबे नैसर्गिकरित्या पिकवले की कृत्रिमरित्या हे कसे ओळखावे...

बऱ्याचजणांच्या घरात गुढी पाडव्यानिमित्त आंब्याची पहिली पेटी (How to identify if the mango is naturally or artificially ripened) हमखास आणली जातेच. परंतु बरेचदा अस्सल, उत्कृष्ट दर्जाचा आंबा आहे असे सांगून आपली फसवणूक केली जाते. यासाठीच अस्सल, ओरिजनल नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा कसा ओळखावा यासाठी काही टिप्स पाहूयात.
अनेक ग्राहक आंब्याच्या रंगाला आणि सुगंधाला भुलून (This is how you can identify artificially ripened mangoes) आंबा खरेदी करतात. अनेकदा आंबे कृत्रिमरीत्या पिकवून ग्राहकांपर्यंत आणले जातात, पण ते नैसर्गिकरीत्या पिकवल्याचे सांगत विकले जातात. यामुळे आंबा खरेदी करताना ते नैसर्गिकरीत्या पिकवले आहेत की, कृत्रिमरीत्या हे ओळखता येणे गरजेचे आहे.
कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग एकसमान असतो. याउलट नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यापेक्षा जास्त पिवळा किंवा केशरी दिसू शकतो. पिकण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे आंबा थोडा चमकदार देखील दिसू शकतो.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याला गोड, फळांसारखा सुगंध येतो. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याला केमिकल्स किंवा वेगळा वास येऊ शकतो. जर आंब्याला विचित्र किंवा खराब वास आला असेल तर तो कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा असू शकतो.
कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यापेक्षा अधिक मऊ वाटू शकतात. कारण पिकण्याच्या प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने फळांमधील पेशींची भिंत तोडून त्यांना मऊ बनवू शकतात.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याच्या गोड आणि चवदार चवीच्या तुलनेत कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याची चव सौम्य किंवा विचित्र असू शकते. जर आंब्याची चव खराब असेल तर तो कृत्रिमरित्या पिकवलेला असू शकतो.
रासायनिक आंबा कापल्यानंतर, त्याच्या आत हिरवे किंवा पांढरे डाग दिसतात. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आतून पिवळा दिसतो.
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा ठेवावा. जर आंबा पाण्यांत बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे आणि जर तो पाण्यावर तरंगत असेल तर तो केमिकल्सच्या मदतीने पिकवलेला असतो.