वांगी किडलेली आहेत की चांगली कसं ओळखाल? भाजी खरेदी करताना लक्षात ठेवा ४ टिप्स
Updated:November 3, 2025 17:17 IST2025-11-03T16:58:29+5:302025-11-03T17:17:46+5:30
How to choose fresh brinjals: Tips to buy good brinjals: Best way to pick eggplants: कोवळी-चविष्ट वांगी ओळखायची कशी हे समजत नसेल तर या टिप्स लक्षात ठेवा.

वांगी ही कुणाला खूप आवडतात तर कोणी पाहताच क्षणी नाक मुरडत. वांग्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. आपण बाजारातून अगदी निवडून आणतो, पण घरी आणल्यानंतर ती निबर आणि बियांवाली असतात.(How to choose fresh brinjals)
बाजारात जांभाळ्या-हिरव्या रंगाची दिसणारी वांगी पाहताच क्षणी आपण विकत घेतो. पण घरी आणल्यानंतर एकतर ती खराब निघतात किंवा त्यात किडे असतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा खाण्याची इच्छा देखील होत नाही. जर आपल्याला वांगी खूप आवडत असतील, पण कोवळी-चविष्ट वांगी ओळखायची कशी हे समजत नसेल तर या टिप्स लक्षात ठेवा.(Tips to buy good brinjals)
वांग्याचा रंग गडद जांभळा आणि त्याची चमक जर नैसर्गिक असेल तर ते वांग ताजं असतं.
अनेकदा वांगं हातात घेतल्यानंतर ते जड आणि घट्ट वाटलं पाहिजे. जर मऊ आणि पोकळ वांगं असेल तर शक्यतो घेणे टाळा.
वांगं ताजं असेल तर त्याचे देठ ओलसर असते. वरील कातडी ही अगदी गुळगुळीत असते. वांग्यावर सुरकुत्या किंवा डाग असतील तर असं वांगं घेऊ नका.
अनेकदा भरलेली वांगी आणि भाजीसाठी वांगी निवडताना आपला घोळ होतो. पण भरली वांगीसाठी गोलसर वांगं आणि भाजीसाठी लांबट वांगं चांगलं असते.
जर वांगं वजनाने जास्त असेल तर त्याच्या आत बिया जास्त असतात. वजनाने हलकी असणारी वांगी खाण्यास चांगली लागतात.