ताक फ्रिजमध्ये ठेवल्यास ते दिवसांच्या आत प्यावं, ताक किती वेळ चांगलं राहतं?
Updated:December 10, 2025 15:48 IST2025-12-10T15:19:51+5:302025-12-10T15:48:30+5:30
How Long Does Buttermilk Stay Good in the Fridge

ताक (Buttermilk) ज्याला काही ठिकणी छाछ किंवा मठ्ठा असेही म्हणतात. ताक हा भारतीय आहाराचा महत्वाचा भाग आहे. दही घुसळून ताक तयार केले जाते. ताकामुळे शरीराला गारवा मिळतो ताक पचनासाठी बरेच फायदेशीर ठरते. पण अनेकदा ताक जास्त प्रमाणात केले जाते किंवा विकत घेतले जाते अशावेळी ते फ्रिजमध्ये किती दिवस साठवावे असा प्रश्न अनेकांना पडतो. (How Long Does Buttermilk Stay Good in the Fridge)
ताक हे दुग्धजन्य उत्पादन असल्यामुळे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्याची साठवणूक अत्यंच महत्वाची ठरते. ताक नेहमी ४ अंश डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमानावर फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे ताकातील जीवाणूनंची वाढ मंदावते.
ताक एका स्वच्छ आणि हवाबंद बाटलीत किंवा डब्यात ठेवा. यामुळे फ्रिजमधील इतर पदार्थांचे वास ताकात मिसळत नाहीत आणि ताक अधिक काळ टिकते. (how long does buttermilk stay fresh in the fridge)
घरी बनवलेले ताक ३ ते ४ दिवस चांगले राहते. बाहेरून विकत आणलेले पॅकेज्ड ताक ७ ते १० दिवस चांगले राहते.
विकत आणलेल्या ताकामध्ये प्रिजर्व्हेटिव्हज असल्यामुळे ते घरी केलेल्या ताकापेक्षा जास्त दिवस टिकू शकते.
ताक खराब झालंय हे कसं ओळखावं?
ताकातून खूपच आंबट किंवा तीव्र वास येत असेल तर. ताकाची चव नेहमीपेक्षा खूप जास्त आंबट किंवा कडवट असेल तर, ताकाचा रंग बदलल्यास किंवा ताक फाटून पाणी वेगळे झाल्यास.
ताक शक्यतो जाते असतानाच पिणं उत्तम ठरतं. योग्य साठवणूक केल्यास तुम्ही याचा आनंद काही दिवस घेऊ शकता.