शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

Updated:May 7, 2025 15:32 IST2025-05-07T12:45:41+5:302025-05-07T15:32:07+5:30

Moringa Benefits : शेवग्याच्या शेंगांची भाजी तर तुम्ही आवडीनं खात असाल, पण याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतील. तेच आज जाणून घेऊया.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

Moringa leaves benefits : हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस, वाढलेलं वजन, रक्त कमी होणे, डोळ्यांची दृष्टी कमी होणे, शरीर कमजोर होणे, हात-पाय दुखणे या समस्या आजकाल फारच कॉमन झाल्या आहेत. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला यातील काहीना काही आजार असतातच. याच वेगवेगळ्या समस्या कंट्रोल करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. अलिकडच्या काळात शेवग्याच्या शेंगा, पानं आणि फुलांवर अनेक रिसर्च करण्यात आले. ज्यात यात किती पोषक तत्व आहेत आणि आरोग्यासंबंधी किती समस्या दूर होऊ शकतात हे समोर आलं. शेवग्याच्या शेंगांची भाजी तर तुम्ही आवडीनं खात असाल, पण याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतील. तेच आज जाणून घेऊया.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

- जर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर तुमच्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी नियमित खाल्ली पाहिजे. कारण यात भरपूर आयर्न असतं. ज्यामुळे एनीमियाची समस्या देखील या भाजीनं दूर होऊ शकते.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

- महिलांना जास्तकरून थायरॉइडची समस्या अधिक असते. महिलांनी जर नियमितपणे शेवग्याच्या शेंगा किंवा पानांची भाजी खाल्ली तर ही समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. तसेच ज्यांना हाय बीपीची समस्या आहे, त्यांच्यासाठी सुद्धा शेवगा औषधासारखं काम करतो.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

- शेवग्याच्या शेंगांच्या सूपमध्ये कॅलरी कमी असतात आणि डायटरी फायबर भरपूर असतं. जे तुमच्या शरीरात वाढलेली चरबी कमी करतं. यातील व्हिटामिन सी मुळे शरीरातील इन्फेक्शन कमी होतं.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

- नियमितपणे शेवगा खाल तर केस आणि हाडे मजबूत होतात. तसेच त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

- शेवग्याच्या शेंगांनी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारांपासून बचाव होतो. यातील तत्वांनी लिव्हरवरील सूज कमी होते.

शेवगा म्हणजे आरोग्यासाठी वरदान, भरपूर आयुष्याची हमी! शेवगा खाण्याचे फायदे माहिती नसल्यानेच होतोय घोळ

- शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅंटी-बायोटीक एजंट म्हणून काम करते.