Join us

Food Tips: वाटाण्याच्या टरफलांचा उपयोग करून तुम्ही पैशांची बचत करू शकता; कशी ते पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 15:49 IST

1 / 6
हिवाळ्यात वाटाण्याच्या वेगवेगळ्या पाककृती बनवल्या जातात. इतर वेळी फ्रोजन वाटाणे विकत आणले जातात, मात्र हिवाळ्यात ताजे वाटाणे आणणे आणि सोलता सोलता तोंडात टाकणे हा एक सोहळाच असतो. वाटाण्याच्या टरफलांचा ढीग तयार होतो आणि तो निरुपयोगी समजून फेकून दिला जातो. मात्र यापुढे ती चूक करू नका.
2 / 6
हिरव्या वाटाण्याच्या टरफलांचा उपयोग करून तुम्ही पैशांची बचत करू शकता. यासाठी वाटाणे सोलून झाल्यावर टरफलं फेकू नका, कारण ती तुमच्या घराचे रक्षण करतील. आश्चर्य वाटले ना? जाणून घ्या वाटाण्याच्या टरफलांचा वापर.
3 / 6
वाटाण्याच्या टरफलांमध्ये पौष्टिक घटक असतात, जे तुमच्या बागेतील झुडुपांना हिरवीगार तसेच निरोगी ठेवण्यास मदत करतात. कंपोस्ट तयार करण्यासाठी, टरफलं गोळा करा. ती कंपोस्ट खड्ड्यात टाका आणि ५-६ दिवस तशीच राहू द्या. अधे मधे ढवळत राहा, त्यामुळे खताची प्रक्रिया वेगाने होईल आणि तयार खत झुडुपांना वापरता येईल.
4 / 6
बागकाम करताना झाडं-झुडुपं यात आर्द्रता टिकून राहावी अर्थात ओल टिकून राहावीत, ती कोरडी पडू नयेत, यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. त्यातच सोपा प्रयोग करून बघा, तो म्हणजे वाटाण्याच्या टरफलांचा! यासाठी टरफले मातीत एकत्र करा. त्यावर पाणी घाला आणि नंतर ती माती झाडांना घाला. वाटाण्याच्या टरफलांमध्ये दीर्घकाळ पाणी साठवण्याची क्षमता असल्यामुळे खतामध्ये आवश्यक आर्द्रता टिकून राहते आणि झाडं टवटवीत राहतात.
5 / 6
गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठीदेखील वाटाण्याच्या टरफलांचा वापर करता येईल. त्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात, जे पाण्यात विरघळलेले अनावश्यक घटक शोषून घेतात. त्यामुळे पाणी फिल्टर केल्यासारखे स्वच्छ होते.
6 / 6
जर तुमच्या आजूबाजूला जास्त डास किंवा किडे असतील तर तुम्ही यासाठी वाटाण्याच्या टरफलांचा वापर करू शकता. यासाठी वाटण्याची टरफले जाळून टाका, त्यातून निघणाऱ्या धुरामुळे डास आणि इतर कीटकांपासून सुटका होऊ शकते.
टॅग्स : अन्नहोम रेमेडी