१ सेकंदात नारळाचे २ तुकडे होतील; पटापट नारळ फोडण्याची भन्नाट ट्रिक-काम होईल सोपं

Updated:August 27, 2025 10:46 IST2025-08-27T10:13:05+5:302025-08-27T10:46:08+5:30

Easy Hacks To Open Coconut : नारळं फोडण्याचं काम सोपं करण्यासाठी नारळ फोडण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

१ सेकंदात नारळाचे २ तुकडे होतील; पटापट नारळ फोडण्याची भन्नाट ट्रिक-काम होईल सोपं

गणपतीच्या दिवसांत सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. गणपती बाप्पांचे आवडते मोदक सर्वांनाच फार आवडतात. पण मोदक करायचं म्हणजे जरा किचकट काम. ओलं नारळ बारीक किसून मोदकांचं सारण बनवलं जातं. नारळं फोडण्याचं काम सोपं करण्यासाठी नारळ फोडण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (Easy Hacks To Open Coconut)

१ सेकंदात नारळाचे २ तुकडे होतील; पटापट नारळ फोडण्याची भन्नाट ट्रिक-काम होईल सोपं

नारळ रात्रभर किंवा कमीत कमी 3-4 तास फ्रीजरमध्ये ठेवा. थंड झाल्यामुळे नारळाचं कवच थोडं कमकुवत होतं आणि तो सहज फुटतो.

१ सेकंदात नारळाचे २ तुकडे होतील; पटापट नारळ फोडण्याची भन्नाट ट्रिक-काम होईल सोपं

नारळाला प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि 1-2 शिट्ट्या होऊ द्या. वाफेमुळे नारळाचं आतील कवच सैल होतं.

१ सेकंदात नारळाचे २ तुकडे होतील; पटापट नारळ फोडण्याची भन्नाट ट्रिक-काम होईल सोपं

नारळ ओव्हनमध्ये 150-180 अंश सेल्सियसवर 15-20 मिनिटांसाठी ठेवा. ओव्हनमधून काढल्यावर नारळ थंड झाल्यावर तो फुटण्यासाठी तयार होईल.

१ सेकंदात नारळाचे २ तुकडे होतील; पटापट नारळ फोडण्याची भन्नाट ट्रिक-काम होईल सोपं

नारळ फोडण्यासाठी विळी, कोयता किंवा मोठा चाकू वापरा. जर तुमच्याकडे हे साधन नसेल तर तुम्ही नारळाला दगडावर किंवा कठीण भागावर आपटू शकता.