पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

Updated:June 15, 2025 17:36 IST2025-06-15T17:33:38+5:302025-06-15T17:36:57+5:30

How to set curd in monsoon: Monsoon curd setting tips: आपणही घरात दह्याचे विरजण जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर सोपी पद्धत लक्षात ठेवा.

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

आपल्यापैकी अनेकांना दुपारच्या जेवणात दही खाण्याची सवय आहे. परंतु, पावसाळा सुरु झाल्यामुळे दही खाण्यास किंवा त्याचे विरजण लावताना त्रास होतो. दही घरी सेट करायचे असेल तर वातावरणातील गारव्यामुळे ते जमत नाही.(How to set curd in monsoon)

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

बाजारातून विकत आणलेले दही आणि घरी जमवलेल्या दह्याच्या चवीत जास्त फरक असतो. दह्याचा डबा सिलबंद असल्यामुळे ते कधी कधी आंबट लागते किंवा त्यात पाणी राहते. जर आपणही घरात दह्याचे विरजण जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर सोपी पद्धत लक्षात ठेवा. (Monsoon curd setting tips)

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

दही जमवण्यासाठी दूध चांगले गरम करुन घ्या. ज्यामुळे त्यातील पाणी आणि अतिरिक्त पदार्थ निघून जातील.

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

दूध कोमट झाले की नाही ते तपासा. यामध्ये १० सेकंद आपला बोट ठेवून बघा. ज्यावरुन दुधाचे तापमान योग्य आहे की, नाही कळेल.

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

दुधामध्ये १ ते २ चमचे तयार फ्रेश दही घाला. स्टार्टर असलेले दही आंबट नसावे. दही घातल्यानंतर ते चांगले मिसळा, ज्यामुळे ते दुधात व्यवस्थित मिसळेल.

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

ज्या भांड्यात दूध घेतले आहे ते भांडे ॲल्युमिनियम फॉइलने किंवा जाड झाकणाने चांगले झाकून ठेवा. आत उष्णता टिकून राहिल्यावर दही चांगले जमेल.

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

प्रेशर कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात दह्याचे भांडे ठेवा. कुकरची शिट्टी लावू नका. वाफेवर दही सेट होईल.

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

१५ मिनिटानंतर कुकरचे झाकण काढा. दह्याचे भांडे बाहेर काढून थंड होण्यास ठेवा. तयार होईल जाडसर घट्ट दही.