ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

Updated:March 12, 2025 19:29 IST2025-03-12T19:12:57+5:302025-03-12T19:29:37+5:30

Don't Waste Leftover Bread, Make This Easy And Delicious Recipe : 6 Unique Leftover Bread Recipes : 6 Delicious Ways to Use Leftover Bread : ब्रेड उरला तर तो वाया जाऊ नये म्हणून शिल्लक राहिलेल्या ब्रेडचे करा चविष्ट पदार्थ...

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

काहीवेळा आपण घरी नाश्त्यासाठी ब्रेड विकत आणतो. परंतु एकाचवेळी हे संपूर्ण ब्रेडचे पाकीट (Don't Waste Leftover Bread, Make This Easy And Delicious Recipe ) संपत नाही अशावेळी आपण हा उरलेला ब्रेड तसाच ठेवून देतो. परंतु हा उरलेला ब्रेड असाच ठेवून नंतर शिळा ब्रेड खाण्यापेक्षा आपण त्याचे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करुन आपण खाऊ शकतो. यासाठीच उरलेला ब्रेड फेकून न देता त्याचे कोणते पदार्थ तयार करता येऊ शकतात ते पाहूयात.

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

शिल्लक राहिलेल्या ब्रेडचे अनेक चविष्ट (6 Unique Leftover Bread Recipes) पदार्थ करता येतात. त्यामुळे उरला ब्रेड तर टेन्शन घेऊ नका. खाली दिलेल्या चविष्ट पर्यायापैकी (6 Delicious Ways to Use Leftover Bread) कोणताही एक पदार्थ करा आणि मजेने खा...

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

दूध,साखर, चिमूटभर दालचिनीची पूड यांचे एकत्रित बॅटर तयार करून त्यात ब्रेड स्लाइस डीप करुन मग गरम तव्यावर ठेवून खरपूस भाजून घ्यावा. असे हे मस्त ब्रेड पुडिंग तुम्ही जेवणानंतर स्वीट डिश म्हणून देखील खाऊ शकता.

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

दूध, साखर आणि केशर यांच्या एकत्रित मिश्रणात ब्रेड स्लाईस भिजवून घ्यावा. त्यानंतर तो तव्यावर खरपूस भाजून घ्यावा. हा भाजून घेतलेला ब्रेड स्लाईस साखरेच्या पाकात घोळवा. उरलेल्या ब्रेड स्लाईसचा शाही तुकडा खाण्यासाठी तयार आहे.

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

ब्रेडचे पोहे करताना कढईत तेल गरम करावं. गरम तेलात हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरच्या फोडणीस घालावं. शेंगदाणे घालून ते परतून घ्यावेत. उकडलेले मटार घालून ते परतावेत. नंतर यात हळद आणि मीठ सर्व जिन्नस नीट एकत्र करुन घ्यावं. नंतर यात ब्रेडचे तुकडे घालून ते परतावेत. ब्रेड पोहे खाण्यासाठी तयार आहेत.

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

ब्रेड कटलेट करताना ब्रेडच्या कडा कापून ब्रेडचे बारीक तुकडे करावेत. त्यात कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन घालावी. आल्याची पेस्ट घालावी. उकडलेला मका घालावा. नंतर यात हळद, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, काळे मिरीपूड आणि चवीनुसार मीठ घालावं. काॅर्नफ्लोअर, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सर्व नीट मिसळून मऊ मळून घ्यावं. मळलेल्या मिश्रणाचे गोल गोल कटलेट करुन गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

ब्रेड पाण्यात भिजवून हातानं दाबून पाणी काढून घ्यावं. किसलेल्या पनीरमध्ये ब्रेड घालून ते एकजीव करावं. त्यात मीठ, आमचूर पावडर घालून मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावं. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. त्यांना थोडं दाबून तेलात तळून घ्यावेत. एका डिशमधे वडे ठेवून त्यावर दही घालावे.

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

ब्रेडच्या कडा कापाव्यात. रोल्सच्या मसाल्यासाठी बटाटे उकडून कुस्करुन घ्यावेत. त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजर या भाज्या घालाव्यात. त्या एकत्र करुन त्यात तिखट, मिरीपूड, धने पावडर आणि मीठ घालावं. सारण नीट मिसळून घ्यावं. ब्रेड पाण्यात बुडवून हातानं दाबून पाणी काढून टाकावं. ब्रेडमध्ये सारण भरुन त्याचा रोल करुन घ्यावा. काॅर्नफ्लोअरमध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून त्याचं सरबरीत मिश्रण तयार करावं. या मिश्रणात ब्रेड रोल बुडवून तव्यावर थोडं तेल घालून त्यावर भाजून घ्यावेत.