Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

Updated:October 8, 2025 17:00 IST2025-10-08T17:00:00+5:302025-10-08T17:00:02+5:30

Diwali faral recipes: Soft Shankarpali tips: Shankarpali recipe: कणिक मळताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास शंकरपाळी खुसखुशीत आणि परफेक्ट होईल.

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

दिवाळीचा फराळ म्हटलं की, फराळासोबत गोडाधोडाचे पदार्थ आलेच. पण त्यातील सगळ्या आवडणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी. शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहे. पण पदार्थांच प्रमाण चुकलं किंवा काही छोट्या चुका झाल्या की ती बिघडते. (Diwali faral recipes)

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

अनेकदा तळल्यानंतर शंकरपाळी कडक होते, चावायला कठीण जाते. तर काहींच्या शंकरपाळ्या मऊ पडतात, कुरकुरीत होत नाही. पण कणिक मळताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास शंकरपाळी खुसखुशीत आणि परफेक्ट होईल. (Soft Shankarpali tips)

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

कणिक खूप मऊ झाली असेल तर शंकरपाळ्या तेल जास्त शोषतात आणि मऊ पडतात. आणि खूप घट्ट कणिक झाली तर त्या कडक होतात. त्यासाठी कणिक मध्यम प्रमाणात मळायला हवी.

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

कणिक मळताना आपल्याला तूप किंवा तेलाचे मोहन २ चमचे पुरेसं असतं. यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात.

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

कणिक मळताना पाणी थंड वापरु नका. थंड पाण्याने कणिक घट्ट होते. कोमट पाण्याने मळल्यास ते मऊ राहते. ज्यामुळे शंकरपाळ्या परफेक्ट होतात.

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

अनेकदा कणिक मळल्यानंतर आपण लगेच शंकरपाळ्या बनवतो पण असं करु नका. त्याऐवजी पीठ १५ ते २० मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवा. ज्यामुळे पीठ सेट होतं आणि शंकरपाळ्या फुगतात.

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

शंकरपाळ्या तळताना तेल खूप गरम नसावं. खूप गरम तेलात शंकरपाळ्या पटकन लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यासाठी मध्यम आचेवर तळा.

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखी कडक होते? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

शंकरपाळ्या गरम असतानाच डब्यात भरल्यास ओलावा राहतो ज्यामुळे त्या मऊ पडतात.