1 / 9स्वयंपाक करताना फक्त योग्य घटकच नाही तर वेळ देखील महत्त्वाची असते. कोणत्या वेळी कोणते मसाले घालावे, कोणत्या भाजीत काय घालायला हवे. हे आपल्याला माहित असायला हवं. नाहीतर त्याचा पदार्थाच्या चवीवर परिणाम होतो. (Cooking tips for beginners)2 / 9अनेकदा भाजी एकदम छान तिखट-चमचमीत बनते. परंतु, मीठ चुकीच्या वेळी घातल्यानं संपूर्ण पदार्थाची चव बिघडते. भाज्यांची स्वत:ची पोत, चव आणि पोषण असते. (Kitchen hacks for better taste)3 / 9आपण घरात अशा काही भाज्या बनवतो ज्या शिजल्यानंतरच त्यात मीठ घालायला हवे. म्हणजेच अगदी शेवटी मीठ घालावे. अशा कोणत्या भाज्या आहेत जाणून घेऊया याबद्दल4 / 9दुधीची भाजी बनवताना मीठ घालण्याची चूक करु नका. भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असते. आपण जेव्हा मीठ घालतो तेव्हा पाण्यासोबतच भोपळ्यातील पोषक घटक निघून जातात. यामुळे भाजीचे पूर्ण फायदे आपल्याला मिळत नाही. भाजी नीट शिजल्यानंतर वरुन त्यात मीठ घाला. 5 / 9ढेमसे ही भाजी शक्यतो कमी खाल्ली जाते. पण मसाले घातल्यानंतर मीठ घातल्यास ती खराब होते. ही भाजी अगदी मऊ असते. जेव्हा आपण त्यात मीठ घालतो तेव्हा ती अजून मऊ होते. त्यामुळे चव बिघडते. 6 / 9भेंडीची भाजी बनवताना लगेच मीठ घातल्याने त्याची चव बदलते. यामुळे ती अधिक चिकट होते. भेंडी चांगली शिजल्यानंतरच त्यात मीठ घाला. 7 / 9वांग्यात लवकर मीठ घातल्याने त्यातून पाणी बाहेर पडते. यामुळे वांगी मऊ राहत नाही आणि चवही बदलते. त्यासाठी वांग्याची भाजी शिजल्यानंतर त्यात मीठ घालावे. 8 / 9कोबीचा कुरकुरीतपणा आणि किंचित गोडपणा टिकून राहावा यासाठी सुरुवातील मीठ घालू नका. सुरुवातीला मीठ घातल्याने भाजी खूप मऊ होते. 9 / 9पालकची भाजी किंवा सूप बनवताना सगळ्यात शेवटी मीठ घालावे. यामध्ये भरपूर लोह असते. जे भाजीत आधीच मीठ घातल्याने कमी होते. त्यामुळे पोषणद्रव्य देखील कमी होतात. पालक शिजल्यानंतरच त्यात मीठ घाला.