भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

Updated:August 15, 2025 15:27 IST2025-08-15T15:24:19+5:302025-08-15T15:27:14+5:30

Garam masala cooking tips : How to add garam masala to curry: Avoid heartburn from spices : गरम मसाला शिजवताना टाळा १ चूक, छातीत जळजळ- आम्लपित्ताचा होणार नाही त्रास

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

गरम मसाला... भाजी, आमटीत किंवा कोणताही पदार्थ बनवताना प्रमाण व्यवस्थित असेल तर मज्जा काही औरच. गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ. यामुळे पदार्थाला सुगंध आणि वेगळी चव येते. अनेकदा लोकांची तक्रार असते की, गरम मसाला खाल्ल्यानंतर आम्लपित्त किंवा पोटात जळजळ होण्याची समस्या वाढते. पण जर आपल्यासोबत असं वारंवार होत असेल तर या काय करायला हवं जाणून घेऊया. (Garam masala cooking tips)

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

आहारतज्ज्ञ श्वेता शाह पांचाळ यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या म्हणतात की, गरम मसाला आम्लपित्त तयार करत नाही. पण त्यात असणारे खडे मसाले पचनास मदत करतात. आपण काही सामान्य चुका केल्यास जळजळ किंवा पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. (How to add garam masala to curry)

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

जास्त तेलात तळलेले मसाले खाल्ल्याने अपचनाचा त्रास होतो. एकाच वेळी जास्त मसाले खाल्ल्याने समस्या निर्माण होतात. पॅकबंद असणाऱ्या मसाल्यांमध्ये विविध पदार्थ किंवा रंगांचा वापर केला जातो. जर पूर्वीपासूनच आपल्या आतड्यांमध्ये जळजळ किंवा आम्लता असेल तर मसालेदार पदार्थ खाल्ल्याने समस्या वाढते.

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

गरम मसाला हा तेलात नेहमी कमी आणि योग्य पद्धतीने शिजवायला हवा, तो कमी तेलात खा. चव वाढवण्यासाठी कमी प्रमाणात पुरेसे आहे. ज्या लोकांना आधीच अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा पोटाच्या समस्या आहेत त्यांनी कमी प्रमाणात सेवन करा.

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

जेवताना सॅलड, दही, ताक प्या. ज्यामुळे मसाल्यांचा परिणाम संतुलित होईल. तसेच घरी बनवलेला ताजा मसाला वापरायला हवा.