1 / 7एखादी वस्तू किंवा औषधे खरेदी करताना आपण सगळ्यात आधी पाहातो ती तिची एक्सपायरी डेट . त्याच्या एक्सपायरी डेटवरुन ती वस्तू खरेदी करायची की नाही हे ठरवली जाते. (Can You Reuse Expired Milk)2 / 7भाजी खराब झाल्यानंतर किंवा पदार्थांना आंबट वास येऊ लागला की, आपल्याला ते खराब झाले समजते. यावरुन आपण ती लगेच फेकून देतो. परंतु, दुधाचे पॅकेट खराब झाले आहे की, नाही हे समजत नाही. (Is It Safe to Drink Boiled Expired Milk)3 / 7आपल्याला पैकी अनेकांना पॅकेटमधील दूध वापरण्याची सवय असते. त्यामुळे आपण १ ते २ लीटरचे दूध घरात आणूनच ठेवतो. परंतु, दूध खराब झाले आहे हे अनेकांना समजत नाही. 4 / 7दुधाच्या पॅकेटवर लिहिलेली एक्सपायरी डेट सांगते की, आपण दूध कधीपर्यंत वापरु शकतो. परंतु असे नसते की, तारीख उलट्यानंतर दूध लगेच खराब होते. कधीकधी दूध एक्सपायरी झाल्यानंतर देखील १ -२ दिवस चांगले राहू शकते. फक्त त्यासाठी तापमान चांगले असायला हवे. 5 / 7दूध गरम केल्यानंतर त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. परंतु दूध खराब झाले असेल तर ते उकळल्यानंतर चांगले राहात नाही. एक्सपायरी झालेल्या दुधात बॅक्टेरिया आणि बुरशीचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यासाठी एक्सपायरी झालेले दूध पिणे शरीरासाठी योग्य नसते. 6 / 7जर दुधाचा वास घाण वास येत असेल तर ते खराब झाले आहे. जर दुधाचा रंग बदलला असेल तर ते वापरु नका. त्याची चव बदलली असेल तर ते पिण्यायोग्य नसते. दुधाला बुरशी किंवा फेस येत असेल तर ते खराब झाले असे समजावे. 7 / 7दूध खराब होऊ नये यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवायला हवे. दुधाचा वापर त्याच्या एक्सपायरी डेट पूर्वी करा. दूध खराब झाले असे वाटत असेल तर त्याचा वापर करु नका.