मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

Updated:November 4, 2025 20:06 IST2025-11-04T20:03:22+5:302025-11-04T20:06:37+5:30

Medu vada tips: Medu vada recipe: How to make perfect medu vada: काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट मेदूवडा घरीच कराल.

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

सकाळचा नाश्ता म्हटलं की आपल्या जीभेवर रेंगाळते ते साऊथ इंडियन पदार्थांची चव. इडली, डोसा, उत्तपा किंवा मेदूवडा. सकाळचा भरपेट नाश्ता खाल्ला की दिवसभर भूक लागत नाही. अनेकदा आपण अण्णाकडच्या किंवा हॉटेलमधील मेदूवड्याची चव चाखतो. हा मेदूवडा घरी ट्राय करण्याचा प्रयत्न देखील करतो. (Medu vada tips)

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

मेदूवडा घरी बनवताना तो कडक होतो, तेलात फुटतो किंवा वातड होतो. दिसायला सुंदर पण अगदीच बेचव लागतो. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट मेदूवडा घरीच कराल.(How to make perfect medu vada)

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

अनेकदा आपण उडीदाची डाळ योग्य पद्धतीने भिजवली नाही किंवा वाटली नाही तर वडा फुटतो. डाळीच वाटण फार पातळ किंवा घट्ट नसावं. मिश्रणात हवा राहिली की तो तळताना फुटतो.

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

मिश्रणात मीठ किंवा पाणी जास्त घालू नका. यामुळे मिश्रण जड होते आणि वडा तळताना फुटण्याची शक्यता अधिक असते.

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

मेदूवडा तळताना जर तेल खूप गरम असेल तर बाहेरुन लाल आणि आतून कच्चा राहतो. ज्यामुळे तो फुगून फुटतो. आणि तेल थंड असेल तर वडा तेलात जास्त वेळ राहून तेलकट आणि कडक होतो.

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

मेदूवड्याचे मिश्रण करताना डाळ किमान ४ तास भिजलेली असायला हवी. पाणी घालताना काळजी घ्या, हलक्या हाताने मिश्रण फेटा. त्यात हवा राहणार नाही याची काळजी घ्या.

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

वडा तळण्याआधी तेल मध्यम आचेवर ठेवा. थोडेसे पीठ घालून तापमान तपासा. मिश्रणात थोडं तांदळाचं पीठ किंवा रवा घातला तर वडे कुरकुरीत होतात आणि आतून मऊ राहतात.

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

वडे बनवताना हाताला थोडे पाणी किंवा तेल लावा म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही. तयार बॅटर लगेच वापरण्याऐवजी थोडा वेळ राहू द्या. ज्यामुळे ते फुगेल आणि वडा परफेक्ट बनेल.