आलू पराठा लाटताना तुटतो-सारण बाहेर येतं? ८ टिप्स, ढाबास्टाईल परफेक्ट पराठा बनेल घरीच
Updated:December 14, 2025 12:51 IST2025-12-14T12:41:16+5:302025-12-14T12:51:47+5:30
Aloo Paratha Recipe : पराठ्यासाठी वापरले जाणारे गव्हाचे पीठ मऊ आणि लवचिक मळून घ्या.

आलू पराठा (Aloo Paratha) लाटताना फाटतो, स्टफिंग बाहेर येतं अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. परफेक्ट आलू पराठा करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. (How To Make Aloo Paratha Easy Way)
आलू पराठा परफेक्ट होण्यासाठी बटाटे जास्त शिजवू नका. ते फक्त मऊ होईपर्यंत शिजवा. नाहीतर स्टफिंग खूपच ओलसर होईल. (Aloo Paratha Making Hacks)
बटाटे शिजल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि त्यांना काही वेळ थंड होऊ द्या.
स्टफिंग करण्यासाठी नेहमी पूर्णपणे थंड झालेले बटाटे वापरा. गरम बटाट्यांमुळे सारण पातळ होऊन पराठा फाटण्याची शक्यता असते.
उकडलेले बटाटे व्यवस्थित स्मॅश करा. सारणात बटाट्याच्या मोठ्या गुठळ्या राहिल्यास पराठा लाटताना तो फाटू शकतो.
सारणामध्ये मसाले जसं की मीठ, तिखट,जीरंपूड आणि आमचूर पावडर यांचे प्रमाण योग्य ठेवा. जेणेकरून चव चांगली येईल.
जर सारण थोडं ओलसर झाले असेल तर त्यात 1 ते 2 चमचे भाजलेले बेसन किंवा ब्रेडचा चुरा मिसळा. यामुळे ओलावा शोषला जाऊन भरण व्यवस्थित बांधले जाईल.
पराठ्यासाठी वापरले जाणारे गव्हाचे पीठ मऊ आणि लवचिक मळून घ्या. कणिक घट्ट असल्यास पराठा लाटताना फाटतो. कणिक मळल्यानंतर ती किमान 30 मिनिटं झाकून बाजूला ठेवा. यामुळे पराठा अधिक मऊ आणि लाटायला सोपा होतो.
कणकेच्या वाटीमध्ये भरण व्यवस्थित भरा आणि कडा हळूवारपणे बंद करा जेणेकरून हवा आत राहणार नाही.पराठा नेहमी हलक्या हातानं आणि समान दाबाने लाटा. कडांपासून लाटायला सुरूवात करून हळूहळू मध्यभागी या.