ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

Updated:May 24, 2025 13:41 IST2025-05-24T13:28:53+5:302025-05-24T13:41:10+5:30

7 Ingredients To Boost Nutritional Value Of Buttermilk In Summer : Buttermilk recipes, healthy drinks for digestion, refreshing : Buttermilk Recipe This summer keep your body hydrated : ताकाची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्यात कोणकोणते पदार्थ घालून पिऊ शकतो, ते पाहा...

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ताक (buttermilk) हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. उन्हाळ्यात दररोज ताक ( Buttermilk recipes, healthy drinks for digestion, refreshing) पिण्याने आपली पचनक्रिया सुधारते, शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचेला चमकदारपणा येतो. खरंतर, उन्हाळ्यात ताक पिण्याचे अनेक फायदे (7 Ingredients To Boost Nutritional Value Of Buttermilk In Summer) आहेत. या ऋतूत ताक पिणे पौष्टिक मानले जाते, पण ताकाची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी (Buttermilk Recipe This summer keep your body hydrated) आपण त्यात कोणकोणते पदार्थ घालून पिऊ शकतो, ते पाहूयात...

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

आयुर्वेदानुसार, जिरं (Cumin) पित्तदोष शांत करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवण्यासाठी जिरे एक उत्तम पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीनुसार, ताकामध्ये भाजलेलं जिरं घालणं ही एक जुनी आणि आरोग्यदायी सवय आहे. यामुळे ताकाची पौष्टिकता अधिक जास्त वाढते.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

ताकामध्ये आलं घातल्याने फक्त त्याच्या चवीतच भर पडत नाही तर, यामुळे ताकाला एक प्रभावी आरोग्यदायी पेयामध्ये रूपांतरित करतं. आयुर्वेदानुसार, आलं पचनक्रिया उत्तम ठेवण्यास अत्यंत उपयुक्त घटक आहे. उन्हाळ्यात होणारे अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी, आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांमध्ये ताकात आलं घालून प्यायल्याने आराम मिळतो.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

पुदिना हा आयुर्वेदात थंड गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा नैसर्गिक थंडावा उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. जेव्हा पुदिना ताकात घालून प्यायले जाते, तेव्हा पुदिन्याचा नैसर्गिक थंडावा शरीरातील उष्णता कमी करतो, पचनक्रियेस चालना देतो, श्वासाला ताजेपणा देतो, शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकायला मदत करतं. यासाठीच, उन्हाळ्यात पुदीना घालून ताक प्यायल्याने अधिक फ्रेश वाटतं.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

कडीपत्त्याची पाने ही फक्त खमंग फोडणी देण्यासाठीच नाही तर, आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. ताकामध्ये कडीपत्ता घातल्याने पचनक्रिया सुधारण्यास व अनेक शारीरिक तक्रारी कमी करण्यास मदत होते. ताजी कडीपत्त्याची पाने थोडी भाजून किंवा बारिक चिरून ताकात मिसळा. चवीनुसार थोडं मीठ, जिरं पावडर व हवे असल्यास थोडं आलं घालून ताक अधिक आरोग्यदायी व चविष्ट करु शकता.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

हिंग हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे. हिंग विशेषतः पचनसंस्थेसाठी फारच उपयुक्त मानले जाते. हिंगाचं ताक हे उन्हाळ्यात होणाऱ्या पचनविषयक त्रासांपासून बचाव करण्यास मदत करते.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

काळ्या मिठाला आयुर्वेदात विशेष महत्त्वाचं मानलं जातं. काळ्या मिठामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिज घटक भरपूर प्रमाणात असतात, जे उन्हाळ्यात घामामुळे कमी होणाऱ्या इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढतात. या खनिज घटकांमुळे स्नायूंना बळ मिळतं आणि थकवा कमी होतो. विशेषतः उन्हाळ्यात ताकात काळे मीठ घालून पिणे फायदेशीर ठरते.

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

अळशीची पूड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून विशेषतः हृदय, मेंदू, पचनक्रिया आणि महिलांच्या विविध आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. अळशीची पूड आपण ताकात मिसळून पिऊ शकता. अळशीमध्ये विद्राव्य (soluble) आणि अविद्राव्य (insoluble) फायबर्स भरपूर प्रमाणांत असतात, जे पचनक्रिया सुरळीत करतात आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे वेटलॉससाठी देखील फायदेशीर ठरते.