1 / 9संक्रांत झाली असली तरी संक्रांतीचे हळदी- कुंकू अजून महिनाभर सुरूच असणार आहे. 2 / 9हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी येणाऱ्या मैत्रिणींना हल्ली काहीतरी नाश्ता दिलाच जातो. नाश्त्यात दिला जाणारा पदार्थ करायला आणि वाढायलाही अगदी सोपा- सुटसुटीत असायला हवा, जेणेकरून त्यात फार वेळ आणि एनर्जी जाणार नाही.3 / 9असे कोणते पदार्थ हळदी- कुंकू कार्यक्रमात येणाऱ्या मैत्रिणींना देता येतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हे काही पर्याय पाहून घ्या.. हे पदार्थ चवदार तर आहेतच, शिवाय सर्व्ह करायलाही अगदी सोपे. 4 / 9तुम्ही मैत्रिणींना मिसळपाव देऊ शकता. मिसळ करून ठेवली आणि कांदा, कोथिंबीर, लिंबू कापून ठेवलं की झाली तयारी. मिसळीसोबत थंड पावच खाल्ला जातो. त्यामुळे तो गरम करण्यात वेळ घालविण्याची गरज नाही.5 / 9इडली- सांबार हा मेन्यूही तसाच आहे. इडल्या थोडं आधी करून ठेवा आणि गरमागरम सांबारासोबत सर्व्ह करा. इडली चटणीही करू शकता. पण इडली आणि चटणी दोन्हीही थंड असतील तर खाताना मजा येत नाही.6 / 9भेळ हा बहुतांश महिलांचा ऑलटाईम फेव्हरेट पदार्थ. भेळ करणंही अगदी सोपं. फक्त चिंचेचं पाणी आणि चिरलेला टोमॅटो आधीच टाकून ठेवू नका. नाहीतर भेळ चिवट होईल.7 / 9हे दिवस गाजराच्या हलव्याचे आहेत. गरमागरम गाजर हलवा मैत्रिणींना दिला तर त्याही खुश होऊन जातील.8 / 9ग्रील न करता व्हेज चीज सॅण्डविजही तुम्ही मैत्रिणींना देऊ शकता. 9 / 9तुमच्याकडे काहीच तयारी करायला वेळ नसेल तर सरळ मसाला दूध करा आणि गरमागरम दूध मैत्रिणींना द्या. त्यासोबत हवं तर विकत मिळणारे वडापाव, दाबेली, चिप्स असं काही तरी आणून ठेवा.