चटणी है क्या? ६ चटण्यांचे पाहा सुपरहिट प्रकार, जेवणाला येईल रंगत-तोंडी लावा चटणी चटपटीत...
Updated:March 21, 2025 16:44 IST2025-03-21T16:33:00+5:302025-03-21T16:44:07+5:30
6 simple dry chutney recipes for snacks & chaat : 6 Types Dry Chutney : Maharashtrian Dry Chutney Recipes : 6 Different Types Of Maharashtrian Dry Chutney : प्रत्येक घरात हमखास तोंडी लावायला केल्या जाणाऱ्या मसालेदार, चमचमीत कोरड्या चटण्यांचे ६ प्रकार...

आपल्याकडील भारतीय थाळीत मुख्य पदार्थांसोबतच ( 6 Different Types Of Maharashtrian Dry Chutney) तोंडी लावण्यासाठी म्हणून काही पदार्थ असतात. या तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांमध्ये पापड,लोणची, कोशिंबीर, ओल्या - सुक्या चटण्या (6 Types Dry Chutney ) असे अनेक पदार्थ असतात. या तोंडी लावण्याच्या पदार्थांपैकी वेगवेगळ्या चवीच्या ओल्या किंवा सुक्या चटण्या खाण्याचा आनंद काही औरच असतो.
काहीवेळा ताटांत नावडती भाजी असली (6 simple dry chutney recipes for snacks & chaat) की आपण चपाती - भात तोंडी लावण्यासाठीच्या चटण्यांसोबत खाऊन फस्त करतो. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या ओल्या व सुक्या चटण्या प्रत्येक घरात हमखास तयार करून ठेवल्या जातात. अशाच काही सुक्या चटण्यांचे चविष्ट प्रकार नेमके कोणकोणते आहेत ते पाहूयात.
१. कडीपत्त्याच्या पानांची चटणी :-
कडीपत्ता धुवून वाळत ठेवायचा. त्यानंतर कढईत तेल घालून उडदाची डाळ भाजून घ्यायची. त्याच तेलात शेंगदाणे आणि नंतर डाळं खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर याच तेलात जीरं आणि लसूण भाजून घ्यायचे आणि सगळे एका ताटात काढून ठेवायचे.कडीपत्ताही पूर्ण कोरडा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि गार करायला ठेवायचा. सगळं साहित्य एकत्र करुन त्यामध्ये मीठ, तिखट आणि चिंच घालायची. हे मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचे आणि एका बरणीत काढून ठेवायचे. ही चटणी २ ते ३ महिने टिकते आणि भात वरण, पोळी कशासोबतही अतिशय छान लागते.
२. जवसाची चटणी :-
सर्वात आधी जवस भाजून घ्या, त्यानंतर कढईत तीळ आणि कढीपत्ता एकेक करून भाजून घ्या. भाजलेले जवस, तीळ आणि कढीपत्ता थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर लसूण, लाल सुक्या मिरच्या, मीठ आणि गरज वाटत असेल तर तिखट असं सगळं मिक्सरमध्ये घाला आणि सगळं मिश्रण एकत्रितपणे वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या. चटणी ताटात वाढून घेतल्यावर त्यावर थोडं कच्चं तेल टाका. चटणीचा स्वाद आणखी छान लागेल.
३. शेंगदाण्याची चटणी :-
शेंगदाणे कढईत कोरडे भाजून घ्यावेत. भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांच्या साली काढाव्यात.आता कढईमध्ये धणे, जिरे, लाल सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ, हिंग, सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून हे सर्व जिन्नस सुके भाजून घ्यावेत. हे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर, थोडे गार झाल्यावर मिक्सरला बारीक पूड होईपर्यंत वाटून घ्यावेत. आता या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या मिश्रणात लाल मिरची पावडर घालून परत एकदा हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे. त्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात भाजून व साली काढून घेतलेले शेंगदाणे घालावेत आता त्यात मिक्सरला बारीक वाटून घेतलेला मसाला घालावा. हे दोन्ही जिन्नस एकत्रित करुन परत एकदा मिक्सरला वाटून त्याची थोडी जाडसर चटणी वाटून घ्यावी.
४. लसूण - खोबऱ्याची चटणी :-
कढईत जिरे घालूंन भाजून घ्यावे. जिरे भाजून घेतल्यानंतर खोबऱ्याचे काप भाजून घ्या. खोबरे भाजल्यानंतर कढईतून काढून घ्या आणि नंतर लसूण थोडा भाजून घ्या. खोबरे, लसूण, जिरे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घाला. तिखट- मीठ घाला आणि चटणी मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या. चटणीला ओलसरपणा यावा म्हणून काही जण चटणी मिक्सरमधून फिरवतानाच त्यात अर्धा चमचा तेल टाकतात. तुम्हालाही ओलसर चटणी आवडत असेल तर तेल टाका. साध्या वरण भातासोबत जरी ही चटणी खाल्ली तरी तिची चव कमाल लागते.
५. तिळाची चटणी :-
कढईत तीळ घालून भाजून घ्या. याच कढईत एक कप शेंगदाणे भाजून घ्या. व त्यातच लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घालून खरपूस भाजून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या घालून बारीक वाटून घ्या. मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यात भाजलेले तीळ, मीठ, लाल तिखट घालून मिश्रण वाटून घ्या. अशा प्रकारे तिळाची खमंग चटकदार रेसिपी खाण्यासाठी रेडी.
६. कारळ्याची चटणी :-
बारीक चिरलेले कारळे, शेंगदाणे, तीळ हे सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. कढईत थोडे तेल गरम करून त्यात कढीपत्ता, लाल मिरच्या आणि जिरे घालून वरून सुके खोबरे घालून खोबरे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून त्यात मीठ, साखर, हिंग घालून मिक्समधून वाटून घ्या. तयार कारळ्याची चटणी बरणीत भरून ठेवा.