1 / 6दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजारात फराळाचे कित्येक वेगवेगळे पदार्थ मिळतात. आपण हौशीने ते आणतो. स्वत: तर खातोच, पण घरी आलेल्या पाहुण्यांनाही आग्रहाने खाऊ घालतो. पण हे सगळं आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. कारण या दिवसांत काही अन्नपदार्थांमधली भेसळ खूप जास्त वाढलेली असते.(5 Festive Ingredients That Are Prone To Adulteration during diwali season)2 / 6त्यातला पहिला पदार्थ म्हणजे खवा. सणासुदीच्या काळात खव्याची मागणी खूप आणि त्यामानाने निर्मिती कमी असल्याने त्यामधली भेसळ प्रचंड वाढते. त्यामुळे खवा असणारे कोणतेही पदार्थ खाणं शक्यतो या दिवसांत टाळायला हवं.3 / 6तुपामधली भेसळही या दिवसांत खूप वाढलेली असते. त्यामुळे बाजारात शुद्ध तुपामध्ये तळलेले पदार्थ असं जरी म्हणून तुपातले पदार्थ विकत असले तरी ते खाताना थोडी काळजी घ्यावी.4 / 6दिवाळीच्या काळात दुधामधली भेसळही वाढलेली असते. त्यामध्ये पाणी, डिटर्जंट आणि स्टार्च घातलं जातं. त्यामुळे जिथे शुद्ध दूध मिळेल अशी खात्री वाटते, तिथूनच दूध घ्या. 5 / 6दूध तसेच खवा, तूप या दुग्धजन्य पदार्थांमध्ये जशी भेसळ वाढलेली असते तशीच ती पनीरमध्येही वाढलेली असते. त्यामुळे या दिवसांत पनीर घेणं आणि खाणं शक्यतो टाळायला हवं.6 / 6दिवाळीच्या दिवसांत तिखट, हळद तसेच इतर मसाले यांच्यामधली भेसळही वाढलेली असते.