अगदीच किडकिडीत दिसता, वजन वाढत नाही? कॉन्स्टिपेशनही होते? प्या तांदळाचे पाणी, पाहा ४ मोठे फायदे
Updated:May 14, 2025 18:05 IST2025-05-14T18:00:00+5:302025-05-14T18:05:01+5:30
Rice water benefits: Drink rice water for weight gain: Rice water for constipation: कितीही काही केले तरी वजन काही वाढत नाही. त्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

कितीही खाल्ले तरी आपले वजन वाढत नाही, त्वचेवर सतत पिंपल्स येतात. अशावेळी किती महागतल्या उत्पादनांचा वापर केला तरी फायदा होत नाही. (Rice water benefits)
वजन वाढवण्यासाठी आपण पुरेसा व्यायाम करतो. डाएट प्लान करतो परंतु, कितीही काही केले तरी वजन काही वाढत नाही. त्यासाठी काही टिप्स फॉलो करा. (Drink rice water for weight gain)
तांदळाचे पाणी हे वजन वाढवण्यासह आरोग्याच्या इतर आजारांवर फायदेशीर आहे. भात खाल्ल्याने वजन वाढते असं म्हटलं जाते परंतु, याचे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात.
आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तांदळाचे पाणी पिऊ शकतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारेल. तसेच गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
वजन वाढवण्यासाठी तांदळाचे पाणी पिऊ शकता. यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. तसेच कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यास फायदेशीर असतात.
तांदळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्स असतात. जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात. रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहाते. थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.
त्वचेची चमक वाढवण्यासाठी रिकाम्या पोटी तांदळाचे पाणी प्यायल्याने त्वचेचा रंग सुधारतो. तसेच त्वचेवरील डाग कमी होतात. शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.