वाढत्या वयाला लागेल ब्रेक! पंचविशीतलं सौंदर्य कायम टिकून राहील- रोज फक्त 'हे' काम करा..
Updated:February 13, 2025 15:03 IST2025-02-13T14:56:34+5:302025-02-13T15:03:15+5:30

वय वाढू द्यायचं नसेल आणि फिटनेस आणि सौंदर्य नेहमीसाठीच टिकवून ठेवायचं असेल तर रोज हे एक काम कराच..
आपल्या शरीराचा लवचिकपणा वाढत्या वयासोबत कमी होऊ द्यायचा नसेल तर शरीराला रोज काहीतरी व्यायाम दिलाच पाहिजे.(best stretching exercise for body flexibility)
पण रोजच्या धावपळीमुळे तुम्हाला व्यायामासाठी वेळ काढणं शक्य होत नसेल तर रोजच्या रोज काही स्ट्रेचिंग नियमितपणे करा. यामुळे शरीर लवचिक राहील आणि शरीरावर अतिरिक्त चरबी साचणंंही कमी होईल (stretching yoga for maintaining figure) असं फिटनेस एक्सपर्ट सांगत आहेत. याविषयीचा व्हिडिओ त्यांनी shivastylefitness या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.(10 minutes exercise for weight loss)
यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दररोज एखाद्या मिनिटासाठी मानेचे व्यायाम करा. मान गोलाकार फिरवणे, खाली- वर, डावीकडे- उजवीकडे अशा पद्धतीने फिरवा.
यानंतर खांद्यांचा व्यायामही नियमितपणे करा. यामुळे खांदे आणि पाठ मोकळी राहण्यास मदत होते. यासाठी ताठ उभे राहा किंवा बसा आणि खांदे मागून पुढे आणि पुढून मागे या पद्धतीने १०- १० वेळा फिरवा.
मान, पाठ, कंबर मोकळी राहण्यासाठी नियमितपणे भुजंगासन करा.
त्याचप्रमाणे कॅट- काऊ पोजसुद्धा निमयमितपणे करा. यामुळे पाठीच्या कण्याचा चांगला व्यायाम होतो आणि शरीराची लवचिकता वाढते.
पर्वतासन करणेही खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे पायाच्या स्नायूंचा व्यायाम होऊन पोटऱ्यांवरची, मांड्यांवरची चरबी कमी होण्यास मदत होते.