1 / 7चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणारी टिकली एरवी नाही तरी खास (5 Tips To Choose The Perfect Bindi Or Tikli For Your Face) कार्यक्रम आणि समारंभांना आवर्जून लावली जाते. अगदी एका छोट्या ठिपक्यापासून ते खडे, मोती यांमध्ये आणि विविध रंगात, आकारात, डिझायनर पॅटर्नमध्ये बाजारात टिकल्या उपलब्ध असतात. आपल्या चेहऱ्याची ठेवण, आपली केसांची स्टाईल आणि आपला एकूण लूक यानुसार प्रत्येकीने टिकलीची निवड करायला हवी. 2 / 7दागिने किंवा हेअरस्टाईलबाबत आपण जितके जागरुक असतो तितके आपण टिकलीबाबत मात्र नसतो. एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण पटकन समोर येईल ती किंवा आपल्या आवडीची एखादी टिकली लावतो आणि जातो. मात्र टिकली लावतानाही बारकाईने विचार करायला हवा. पाहूयात कोणत्या प्रकारच्या चेहऱ्यासाठी कशी टिकली चांगली दिसेल याविषयी...3 / 7जर तुमचा चेहरा गोलाकार असेल तर नेहमी लहान गोलाकार टिकलीची निवड करावी. जर तुम्ही मोठी आणि गोलाकार टिकली निवडली तर तुमचा चेहरा अधिकच भरीव आणि जाड दिसेल. अशा परिस्थितीत, एकतर लहान गोलाकार टिकली किंवा लांब उभ्या आकाराची टिकली लावावी. लांब उभ्या आकाराची टिकली लावल्याने तुमचा चेहरा लांब दिसेल. गोल चेहऱ्याला मोठ्या आकाराच्या गोल टिकल्या लावल्या तर तुम्ही आणखी गोल गोल दिसता. त्यापेक्षा उभी टिकली लावली तर चेहऱ्यामध्ये नक्कीच थोडा फरक पडतो. 4 / 7 जर तुमचा चेहरा अंडाकृती आकारात असेल तर उत्तम आहे. कारण अंडाकृती आकाराच्या चेहऱ्यावर प्रत्येक डिझाईन्स आणि कोणत्याही आकाराची टिकली शोभून दिसते. तुम्ही कोणतीही लहान, मोठी किंवा लांब डिझाईन्सची टिकली लावू शकता. अंडाकृती आकारातील चेहऱ्यावर मध्यम आकाराची गोलाकार टिकली परफेक्ट शोभून दिसते. मात्र त्यांनी खूप उभट आकाराची टिकली लावू नये नाहीतर चेहरा आणखी उभट दिसतो. तसेच लिपस्टीक आणि टिकली यांचा रंग जवळपास सारखा असलेला चांगला.5 / 7जर तुमचा चेहरा हार्टशेप आकाराचा असेल तर लहान आणि हलक्या डिझाईन्सच्या टिकलीची निवड करावी. खूप मोठी किंवा रुंद टिकली लावल्याने कपाळ आणखी रुंद दिसू शकते. म्हणून, स्टोनने बनलेली छोटी आणि साधी टिकली या चेहऱ्यावर नेहमीच सुंदर दिसते. हार्ट शेपचा चेहरा असणाऱ्या मुलींनी शक्यतो लहानशी नाजूक टिकली लावावी. 6 / 7जर तुमचा चेहरा चौकोनी असेल तर तुम्ही गोल किंवा वक्र आकाराची टिकली लावावी. खूप रुंद किंवा लांब टिकली लावल्याने चेहरा आणखी रुंद दिसू शकतो. यासाठीच, शक्यतो, मोठ्या टिकल्या लावणे टाळा. चौकोनी चेहरा असणाऱ्या महिलांना चंद्रकोरीच्या आकाराची टिकली जास्त खुलून दिसते. इतकेच नाही तर गोल टिकलीही अशा महिलांचा चेहरा बॅलन्स करण्यासाठी उपयुक्त ठरते. 7 / 7 जर तुमचा चेहरा डायमंड शेप आकाराचा असेल तर तुम्ही फक्त पातळ, लांब आणि हलक्या डिझाईन्सच्या टिकल्यांची निवड करावी. डायमंड शेप चेहऱ्यावर फक्त पातळ आणि लांब टिकलीच चांगली दिसते. अशा महिलांनी खूप रुंद किंवा खूप लहान टिकली लावणे टाळावे.