Join us   

World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 11:46 AM

1 / 7
२१ डिसेंबर हा दिवस जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. बॉलीवूड आणि साडी यांचं नातं एकदम घट्ट... म्हणूनच तर रेखा, विद्या बालन ते आताच्या अगदी आलिया भट पर्यंत अनेक अभिनेत्री बऱ्याचदा साडीमध्येच दिसून येतात.
2 / 7
जागतिक साडी दिनानिमित्त हे पाहूया की आतापर्यंत कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीने सगळ्यात महागडी साडी नेसली..
3 / 7
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय याबाबतीत नंबर १ वर आहे. तिने तिच्या लग्नात नेसलेली सोनेरी रंगाची कांजीवरम साडी ही तब्बल ७५ लाख रुपयांची होती. या साडीवर अनेक स्वरोस्की डायमंड जडवलेले होते तसेच साडीवरची एम्ब्रॉयडरी सोन्याच्या धाग्यांनी केलेली होती. नीता लुल्ला यांनी ती साडी डिझाईन केलेली होती.
4 / 7
ऐश्वर्याच्या खालोखाल नंबर येतो शिल्पा शेट्टीचा. शिल्पा शेट्टीने तिच्या लग्नात नेसलेली साडी ५० लाखांची होती. या साडीवरही तब्बल ८ हजार स्वरोस्की डायमंड जडवलेले होते. तरुण ताहिलियानी यांनी शिल्पाची ही महागडी साडी डिझाईन केली होती.
5 / 7
अभिनेत्री जेनेलिया डिसुझा हिने तिच्या लग्नात नेसलेली साडी १७ लाखांची होती. तिची ही साडीसुद्धा नीता लुल्ला यांनी डिझाईन केलेली होती. साडीच्या काठांवर स्वरोस्की डायमंड आणि गोल्डन थ्रेड यांचं सुंदर वीणकाम केलेलं होतं.
6 / 7
कतरिना कैफने नेसलेल्या या पीच रंगाच्या साडीची किंमत ७. ५ लाख रुपये आहे.
7 / 7
उर्मिला मातोंडकरने तिच्या लग्नात नेसलेली ही लेहेंगा साडी ४. ५ लाखांची असून ती मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे.
टॅग्स : फॅशनसाडी नेसणेकतरिना कैफऐश्वर्या राय बच्चनशिल्पा शेट्टीउर्मिला मातोंडकरजेनेलिया डिसूजा