Join us

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिविता राय, विश्वसुंदरीचा ताज जिंकेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2023 19:14 IST

1 / 9
सर्व जगाच्या नजरा आता मिस युनिव्हर्स या स्पर्धेकडे लागल्या आहेत. ही स्पर्धा १४ जानेवारी २०२३ रोजी, अमेरीकेतील न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना येथील अर्नेस्ट एन मोरिअल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू होईल. यापूर्वी भारताच्या सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू यांनी विश्वसुंदरीचा हा मुकुट आपल्या डोक्यावर सजवला होता. आता या स्पर्धेच्या मैदानात भारताकडून कर्नाटकातील मॉडेल दिविता राय उतरली आहे.
2 / 9
या स्पर्धेत जगभरातून ८६ महिला सहभागी होणार आहेत. भारताकडून दिविता राय यात सहभागी होणार आहे. भारताला तिच्याकडून खूप आशा आहेत.
3 / 9
मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या राष्ट्रीय वेशभूषा फेरीत दिविता रायने 'सोने की चिडिया' अशी वेशभूषा परिधान केली होती. या पोशाखात ती खूपच सुंदर दिसत होती. भारताला 'सोने की चिडिया' अशी उपमा दिली जाते. सोन्याचा पोशाख परिधान केलेले दिविताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4 / 9
या कार्यक्रमासाठी तिचा आउटफिट अभिषेक शर्माने डिझाइन केला होता. यातील तिचा मनमोहक आणि सोनपरीचा अनोखा अंदाज प्रत्येकाला भावला.
5 / 9
दिविता रायचा जन्म 10 जानेवारी 1998 रोजी मंगळूर येथे झाला. तिने कर्नाटकातील राजाजीनगर येथील नॅशनल पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ती मुंबईला गेली.
6 / 9
दिविताने मुंबईच्या सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन केले आहे. ती व्यवसायाने एक मॉडेल तसेच आर्किटेक्ट आहे.
7 / 9
दिविता रायला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते. तिला चित्रकला आणि संगीताचीही आवड आहे.
8 / 9
दिविताचे वडील इंडियन ऑईलमध्ये काम करतात. वडिलांमुळे ती देशातील अनेक शहरांमध्ये राहिली आहे. तिच्या कुटुंबामध्ये तिचे आई-बाबा आणि एक भाऊ असा परिवार आहे.
9 / 9
दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकला आहे. अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड सुष्मिता सेन ही तिची प्रेरणा आहे.
टॅग्स : मिस युनिव्हर्सफॅशन