Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सावळा गं रंग माझा...! शोभून दिसतात ७ रंगांच्या साड्या, खुलून दिसतो लूक- चेहऱ्यावरही येईल चकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2025 21:10 IST

1 / 9
त्वचेचा रंग सावळा, गव्हाळ असला की अनेकांना वाटते कपड्यांच्या बाबतीत मर्यादा येतात. पण खरं सौंदर्य योग्य रंग निवडण्याच्या बाबतीत असतं. सावळ्या रंगावर काही रंग इतके उठून दिसतात की ज्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व खुलून एक वेगळीच चमक येते. (dusky skin saree colours)
2 / 9
सावळ्या रंगावर सर्वात शोभून दिसणारे ७ कपड्यांचे रंग. जे आपण खास प्रसंगासाठी, पार्टीसाठी, ऑफिससाठी किंवा दररोजच्या कॅज्युअल स्टायलिंगसाठी आरामात वापरू शकता.(best saree colors for dark skin)
3 / 9
रॉयल ब्लू हा रंग सावळ्या रंगाच्या त्वचेवर अधिक खुलून दिसतो. हा नैसर्गिक रंग आपल्या त्वचेला ग्लो देतो.
4 / 9
मस्टर्ड यलो हा रंग गव्हाळ रंगाला ब्राइटनेस देतो. हळदीसारख्या खास क्षणी नवरी हा रंग ट्राय करु शकते.
5 / 9
डीप मरुन हा रंग आपल्याला रिच, फेस्टिव्ह आणि क्लासी टच देतो. जर आपण पार्टी किंवा फंक्शनला जाणार असाल तर हा रंग नक्की ट्राय करा.
6 / 9
सावळ्या रंगावर शोभून उठून दिसणारा रंग ऑलिव्ह ग्रीन. हा आपल्याला एलिगंट टोन देतो.
7 / 9
जर आपण रात्रीच्या फंक्शनला जाणार असाल तर वाइन पर्पल रंग नक्की ट्राय करा.
8 / 9
आपल्याला साधा पण रिच लूक हवा असेल तर बॉटल ग्रीन ट्राय करु शकता. यावर कॉन्ट्रास्ट ज्वेलरी फार सुंदर दिसते.
9 / 9
कॉपर रंग अर्थात सोनेरी रंग देखील सावळ्या रंगावर उठून दिसतो. या रंगामुळे आपण पार्टीत अधिक आकर्षित दिसू.
टॅग्स : फॅशनब्यूटी टिप्स