डोपामाइन ड्रेसिंग ट्रेंड जो Gen Z मध्ये होतोय लोकप्रिय, मानसिक आरोग्याशी आहे संबंध

Updated:October 11, 2025 10:14 IST2025-10-11T09:59:34+5:302025-10-11T10:14:15+5:30

Dopamine Dressings Trends : सध्या सोशल मीडियावर आणि फॅशन जगतात सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेंड म्हणजे डोपामाइन ड्रेसिंग.

डोपामाइन ड्रेसिंग ट्रेंड जो Gen Z मध्ये होतोय लोकप्रिय, मानसिक आरोग्याशी आहे संबंध

Dopamine Dressings Trends : फॅशनच्या दुनियेत दररोज नवनवे ट्रेंड्स येत असतात. आजची Gen Z पिढी या बदलांशी अगदी जवळून जोडलेली आहे. सध्या सोशल मीडियावर आणि फॅशन जगतात सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेंड म्हणजे डोपामाइन ड्रेसिंग म्हणजे असे कपडे घालणं जे मनाला आनंद, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देतात.

डोपामाइन ड्रेसिंग ट्रेंड जो Gen Z मध्ये होतोय लोकप्रिय, मानसिक आरोग्याशी आहे संबंध

काही संशोधनांनुसार, रंग आपल्या मेंदूमध्ये 'डोपामाइन' नावाचा हॅपी हार्मोन सक्रिय करतात, जो मूड सुधारतो आणि मन प्रसन्न ठेवतो. त्यामुळेच लोक आता ब्लॅक, व्हाइट किंवा न्यूट्रल शेड्सपासून दूर जाऊन व्हायब्रंट कलर्स जसे की पिंक, ऑरेंज, यलो, इलेक्ट्रिक ब्लू आणि ग्रीन आपल्या वॉर्डरोबमध्ये सामावून घेत आहेत.

डोपामाइन ड्रेसिंग ट्रेंड जो Gen Z मध्ये होतोय लोकप्रिय, मानसिक आरोग्याशी आहे संबंध

2025 च्या सुरूवातीपासून हे रंग फॅशनमध्ये अधिक प्रभावीपणे झळकू लागले आहेत. ब्राइट पिंक ला आता “पॉवर कलर” म्हटले जाते कारण तो आत्मविश्वास वाढवतो; यलो हा एनर्जी आणि पॉझिटिविटीचे प्रतीक आहे; तर इलेक्ट्रिक ब्लू आणि ऑरेंज हे क्रिएटिविटी वाढवण्यासाठी परफेक्ट शेड्स मानले जातात.

डोपामाइन ड्रेसिंग ट्रेंड जो Gen Z मध्ये होतोय लोकप्रिय, मानसिक आरोग्याशी आहे संबंध

अनेक फॅशन ब्रँड्सनी आपल्या नवीन कलेक्शनमध्ये हा ट्रेंड आत्मसात केला आहे. रॅम्पवरून रस्त्यांपर्यंत सर्वत्र या रंगांचा उत्सव दिसून येतोय. आजची Gen Z पिढी ऑफिससारख्या ठिकाणीही वेगवेगळे कलरफुल आउटफिट्स घालून आपला मूड आणि आत्मविश्वास व्यक्त करत आहे.

डोपामाइन ड्रेसिंग ट्रेंड जो Gen Z मध्ये होतोय लोकप्रिय, मानसिक आरोग्याशी आहे संबंध

एकंदर काय तर डोपामाइन ड्रेसिंग ही फक्त फॅशन नाही, तर एक मूड थेरपी आहे जी उदासीनता दूर करून आनंद आणि आत्मविश्वासाचा रंग आपल्या जीवनात भरते.