Join us

लग्नसमारंभाला स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घालून जाताय? लक्षात ठेवा ५ टिप्स, दिसाल सुंदर आणि मोहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 17:15 IST

1 / 7
लग्नसराईत स्टायलिश आणि मॉर्डन लूकसाठी आपण स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घालतो परंतु, अशा पद्धतीचे ब्लाऊज घालताना आपल्याला काही फॅशन टीप्स लक्षात ठेवायला हवे. (Sleeveless blouse styling tips)
2 / 7
नेकलाइन, बॅक डिझाइन आणि फिटिंगपासून अनेक गोष्टी असतात जे आपल्या सौंदर्याला अधिक आकर्षित करतात. जर आपण देखील लग्नसराईत किंवा पार्टीमध्ये स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घालणार असाल तर या गोष्टींकडे अधिक लक्ष द्या. (Wedding fashion tips for women)
3 / 7
स्लीव्ह्जलेस ब्लाऊज हे वेगवेगळ्या नेक स्टाइलमध्ये पाहायला मिळतात. परंतु, साडीनुसार आणि आपण तो ब्लाऊज कोणत्या खास क्षणासाठी घालत आहोत ते लक्षात असायला हवे. लग्न किंवा ग्लॅमरस लूकसाठी आपण डीप व्ही नेक किंवा स्वीटहार्ट नेकलाइन्स घालू शकतो.
4 / 7
पार्टी आणि कॉकटेल साड्यांसह हॉल्टर नेक किंवा स्ट्रॅपी ब्लाउज छान दिसतात .
5 / 7
बॅकलेस किंवा टाय-अप डिझाइन्स हा आपल्याला बोल्ड लूक देण्यास मदत करेल. कीहोल, बटण क्लोजर किंवा नेट पॅच असणारे बॅक डिझाइन स्टाईलमध्ये भर घालतात.
6 / 7
स्लीव्ह्जलेस ब्लाऊज तेव्हाच चांगले दिसतात जेव्हा त्याची फिटिंग चांगली असते. असे ब्लाऊज वापरताना त्यात कप किंवा स्टिक ऑन ब्रा चा वापर करा.
7 / 7
कॉटन स्लीव्ह्जलेस ब्लाऊज कॅज्युअल फंक्शनसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये आपण भरतकाम, स्टोन किंवा मखमली कापडापासून बनवलेले ब्लाऊज निवडू शकतो.
टॅग्स : फॅशनमहिला