साहावारीची नऊवारी नेसणं अगदीच सोपं, लक्षात ठेवा या '५' टिप्स.. साडी एकदम मस्त बसेल
Updated:March 23, 2025 15:05 IST2025-03-23T14:55:36+5:302025-03-23T15:05:01+5:30
Wearing Nauvari from Sahavari is very easy, remember these '5' tips.. The saree will fit perfectly : सहावारीची नऊवारी नेसताना या काही गोष्टी लक्षात ठेवा साडी एकदम मस्त बसेल.

पाडव्यासारख्या सणांना आपण नऊवारी साडी नेसतोच. आपल्या मराठी नववर्षाची सुरवात मराठमोळी व्हावी यासाठी आपण साजही मराठमोळाच निवडतो.
नऊवारी साडी नेसणं मात्र सोपं काम नाही. घरी आजी असेल तर ती छान नेसवून देऊ शकते. मात्र अनेकांना नऊवारी नेसता येत नाही.
साडी नेसणं ही एक कलाच आहे. आता नेसण्याऐवजी साडी घालणं महिला सोयीस्कर वाटते. अनेक जणी रेडिमेड साडी वापरतात.
पण एक नवा ट्रेंड आहे ज्यामध्ये साध्या सहावारी साडीचा वापर करून नऊवारी साडी नेसता येते. मग घरात असलेल्या कोणत्याही साडीचा वापर करणं सहज शक्य आहे.
रेडिमेड नऊवारी फार महाग असते. त्यापेक्षा घरी असलेल्या सहावारचा वापर करा आणि मस्त साडी नेसा. अगदी १५ मिनिटांमध्ये नेसून होते. या काही टिप्स लक्षात ठेवा.
१.सर्वात महत्त्वाचं म्हणजे साडी जरा मोठी घ्या. साडीचे ब्लाऊज पिस जर कापले नसेल तर ते तसेच राहू द्या. नऊवारी नेसताना साडी जर लहान असेल तर ती सारखी वर वर जाते.
२.साडीच्या आतमध्ये साडीच्या रंगाची लेगिंज घाला. किंवा लांब पॅन्ट घाला. साहावारीची नऊवारी जरा ट्रास्परंट दिसते. तसेच पायाजवळ जरा उघडी पडते. त्यामुळे साडीच्या रंगाची लेगिंज घालणे कधीही उत्तम.
३.बऱ्याच जणी मांडीजवळ मागच्या बाजूला सेफ्टी पिन लावतात. ती लाऊ नका. बसताना चालताना ती टोचू शकते. त्याऐवजी पायाजवळ अगदी खोटे जवळ एक पिन लावा. सैलच लावा साडी छान बसते.
४.अशी नऊवारी नेसताना पदर तरी लहान येतो नाही तर साडीची उंची तरी. मग अशावेळी पदर ज्या पायातून घेणार त्याच्या विरूद्ध पायाला साडी जरा जास्त चापून घ्यायची. कारण तिथे काही फाटण्याची शक्यता नसते.
५. साडी नेसताना कंबरेशी पहिली जी गाठ बांधता ती एकदम घट्ट हवी. त्या गाठीच्या जोरावर पुढची साडी आपण नेसतो. त्यामुळे पहिली गाठ बांधताना साडी जास्त वापरली तरी चालेल पण ती गाठ घट्टच हवी.