Join us

साडीवर तसेच ड्रेसवर घाला हे पारंपारिक कानातल्यांचे प्रकार, सुंदर आणि हलके डिझाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 14:45 IST

1 / 8
काही कानातले असे असतात ज्यांचे डिझाइन फार कॉमन असते तर काहींचे अगदी वेगळे. भारतीय पेहरावाला साजेशी कानातल्यांची डिझाइन्स पाहा आणि नक्की वापरा.
2 / 8
गुलाबी आणि सोनेरी हे कॉम्बिनेशन कायम सुंदरच दिसते. काठापदराची साडी असेल तर त्यावर हे कानातले अगदी उठून दिसतील.
3 / 8
लहान नाजूक खडा कानातल्यात तसेच माळेतही सुंदर दिसतो. त्याला लहान लटकन असतील तर कानातल्याची शोभा वाढते.
4 / 8
देवीचे सुंदर डिझाइन असलेले सोनेरी कानातले साडी ड्रेसवर फार छान दिसतात. त्यावर मोराचेही नक्षीकाम केलेले आहे.
5 / 8
जसा पदरावर मोर छान वाटतो तसाच कानातल्यांवरही अगदी सुंदर वाटतो. गुलाबी खड्यामुळे मोराचा पिसारा अगदी सुंदर दिसतो.
6 / 8
मोराचा कानचाप आणि त्याला लागूनच कानातले हे डिझाइन टू इन वन लूक देते.
7 / 8
मंदिर डिझाइन हा कानातल्यांचा पॅटर्न भारतात फार लोकप्रिय आहे. कोरीव काम केलेले कानातले दिसायला फार सुंदर असतात.
8 / 8
साधे कानातले अगदी सुंदर दिसतात. कायम भरगच्चच घालायला हवेत असे काही नाही. पारंपारिक कानातले लहानही असतात.
टॅग्स : फॅशनमहिलासांस्कृतिकब्यूटी टिप्स