Join us

व्हाट झुमका!! लग्नसराईत घाला ‘असे’ मोठे कानातले, साध्या लूकवरही पाहणारे होतील फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 19:29 IST

1 / 8
लग्नसराई म्हटलं की, आपल्याला सुंदर दिसायचं असतं त्यासाठी आपली आधीपासूनच पूर्व तयारी सुरु असते.
2 / 8
आपल्याला फार नटायचं नसेल पण सगळ्यांमध्ये आकर्षित दिसायचं असेल तर हा एथनिक लूकमध्ये ज्वेलरीने त्यात भर घालू शकता. (Heavy Wedding Jhumkas)
3 / 8
लेहेंगा किंवा साडीवर कुंदनच्या दागिन्यांचा पर्याय चांगला लूक देतो. यामध्ये मोठे कुंदनचे कानातले घातल्यास उठून दिसाल. (Wedding Jhumka Collection)
4 / 8
हुप डिझाइन्स असलेले कानातले कोणत्याही पेस्टल रंगाच्या साडीवर घालू शकता. दिसायला हे अधिक सुंदर असल्यामुळे चेहऱ्यात आणखी भर घालतात. (Ethnic Jhumkas for Brides)
5 / 8
सध्या बाजारत नवीन ट्रेण्डचे कानातले पाहायला मिळत आहे. यामध्ये मंदिर असलेलं किंवा श्रीकृष्ण, मोरपीस असं अनेक प्रकार आहेत. आवडत्या रंगानुसार खरेदी करु शकता.
6 / 8
साडी काठापदराची असेल तर आपण मोत्याचे झुमके घालू शकतो. मोतीचे कानातले अधिक उठावदार दिसतात ज्यामुळे तुमचा लूक परिपूर्ण होईल.
7 / 8
तुमची साडी किंवा लेहेंगा भरलेला असेल तर त्यावर काश्मिरी झुमका घालू शकता. यामध्ये थरवाले कानातले आहेत. ज्यात तुम्ही मोतीचे दोर केसांमध्ये अडकवू शकतात.
8 / 8
कुंदन वर्कमध्ये चांदबाली मोत्याचे कानातले प्लेन साडीवर शोभून दिसतात. लग्नसराईत या कानातल्यांना जास्त पसंती असते.
टॅग्स : फॅशन