Join us

झोपताना छान सुटसुटीत कपडेच घाला.. पाहा असे पॅटर्न जे दिसतील मस्त आणि तुम्ही राहाल स्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 18:36 IST

1 / 10
रात्री झोपताना कपडे अगदी सुटसुटीत आणि त्वचेसाठी चांगलेच वापरायला हवे. कपड्यांमुळे त्वचेला त्रास होईल किंवा आराम मिळणार नाही असे कपडे झोपताना वापरूच नयेत.
2 / 10
दिवसभर लोकांच्या अवतीभवती असताना व्यवस्थित टापटीप कपडे आपण वापरतो. मग कधी ड्रेसकोड फॉलो करताना आपल्याला आरामदायी न वाटणारे कपडेही वापरावे लागतात. मात्र झोपताना तसे काही नाही. आवडतील आणि आराम मिळेल असेच कपडे वापरायचे.
3 / 10
अनेक महिला झोपताना गाऊन घालतात. मोकळा असा गाऊन फार कम्फर्टेबल असतो. गाऊन घातल्यावर शरीराजवळ हवा खेळती राहते. त्यामुळे घाम येत नाही.
4 / 10
आजकाल शॉर्ट गाऊनची फॅशन आहे. कॉटनचे शॉर्ट गाऊन दिसतातही छान आणि फार कम्फर्टेबल असतात.
5 / 10
टिशर्ट आणि शॉर्ट पॅन्ट हा फार कॉमन असा नाईट सुट आहे. अनेक जणी हा प्रकार वापरतात.
6 / 10
नाईट ड्रेस म्हटल्यावर असा वन पीस असायलाच हवा. तरुण मुली आजकाल हा पॅटर्न मोठ्या प्रमाणावर वापरतात. त्यामध्ये छान रंग व डिझाइन असतात.
7 / 10
नाईट ड्रेस पॅटर्नमध्ये असे शर्ट पॅन्टचे सेट भरपूर चालतात. त्यांना चांगलीच मागणी असते.
8 / 10
पॉकेट गाऊन हा सध्या ट्रेंडिंग आहे. गाऊनला एक खिसा असतो, ज्यामध्ये मोबाइल राहिल एवढी जागा असते.
9 / 10
थंडीच्या दिवसांमध्ये किंवा फिरायला जाताना वापरण्यासाठी थ्री पीस नाईट सुट हा प्रकार नक्कीच मस्त आहे. कॉटनच्या कापडाचा हा ड्रेस दिसतोही छान.
10 / 10
नाईट ड्रेसमध्ये कफ्तान हा पॅटर्न फार लोकप्रिय आहे. दिसायला अगदी क्लासिक आहे तसेच मोकळा व सुटसुटीत आहे.
टॅग्स : महिलाफॅशनखरेदी