1 / 6सणसमारंभ, लग्नसराईत दागिन्याचे नवनवीन ट्रेंड येत असतात. पण काही डिझाइन्स अशा असतात ज्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 'व्हिक्टोरिया मंगळसूत्र' हे त्यापैकीच एक! हे मंगळसूत्र जुन्या काळातील राजेशाही थाट आणि आधुनिक फॅशन यांचा एक अप्रतिम संगम आहे. (Victoria pattern mangalsutra price)2 / 6व्हिक्टोरियन काळातील कलाकुसरीचा प्रभाव असलेल्या या मंगळसूत्रांची क्रेझ सध्या मराठी स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तुम्ही साधी साडी नेसली असो किंवा एखादा भारी दागिना घातला असो. व्हिक्टोरिया मंगळसूत्र आपल्या सौंदर्यात एक वेगळीच भर घालते. पाहूयात त्याचे नवीन ट्रेंडी पॅटर्न. (Lagna sathi trendy mangalsutra)3 / 6क्लासिक व्हिक्टोरियन पेन्डंट यामध्ये पेन्डंटचा आकार सहसा लंबवर्तुळाकार किंवा गोलाकार असतो. यात मध्यभागी एखादा मोठा खडा किंवा मोत्याची नक्षी असते. हे डिझाइन रॉयल लूकसाठी ओळखले जाते.4 / 6फ्लॉवर आणि लीफ पॅटर्न नावानुसारच या मंगळसूत्राच्या पेन्डंटवर फुले आणि पानांची अतिशय नाजूक कलाकुसर केलेली असते. हे डिझाइन दिसायला अत्यंत सोबर आणि सुबक असते, जे डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी उत्तम ठरते.5 / 6जर आपल्याला मोत्यांचे दागिने आवडत असतील, तर व्हिक्टोरिया डिझाइनमध्ये मोत्यांची जोड असलेले पेन्डंट खूपच सुंदर दिसते. काळ्या मण्यांच्या दोन पदरी सरासोबत हे पेन्डंट अधिक उठावदार दिसते.6 / 6आजकाल सोन्याच्या दागिन्यांसोबतच ऑक्सिडाइज्ड किंवा सिल्व्हर फिनीशमधील व्हिक्टोरिया मंगळसूत्रांना खूप मागणी आहे. इंडो-वेस्टर्न कपड्यांवर किंवा कॉटनच्या साड्यांवर हा लूक अतिशय 'स्टायलिश' दिसतो.