1 / 7घरात आरामदायी कपडे घालण्यात जे सुख आहे ते दुसऱ्या कशातच नाही. पण अचानक पाहुणे आले किंवा काही सामान आणायला बाहेर जायचे असेल तर कपडे बदलावे लागतात. त्याचा फार कंटाळा येतो. 2 / 7असे काही नाईट सुट्स आहेत जे दिसायला अगदी सुंदर असतात. जे फार आरामदायी असतात आणि घरी पाहुणे आले तरी धावपळ करुन बदलायची गरज पडत नाही. जवळपासच बाहेर जातानाही वापरु शकता.3 / 7कॉटनचा टॉप आणि पायजामा सेट अगदी सुंदर दिसतो. तसेच वापरायलाही सोपा आणि बाजारात आरामात उपलब्ध होतो. 4 / 7आजकाल ट्रेंडींग असलेला एक प्रकार म्हणजे कॉटन शर्ट आणि सैलसर अशी पॅण्ट. गडद रंगाचे असे सेट्स फारच छान दिसतात. नक्की वापरुन पाहा. 5 / 7रुंद बाह्या आणि सैल फिटिंग असलेला कफ्तान प्रकारचा नाईट ड्रेस अतिशय आरामदायी असतो. दिसायलाही एलिगंट वाटतो आणि घरी वावरताना सहज वापरता येतो.6 / 7शॉर्ट कुर्ता आणि प्लाझो असाही नाईट सुट मिळतो. तो वापरायला अगदीच सोपा आणि आरामदायी असतो. कॉटनचा असल्यामुळे शरीरालाही छान वाटतो. मऊ असतो. 7 / 7जर तुम्हाला थ्री फोर्थ पॅण्ट आवडते तर हा प्रकार आणि वरती टीशर्ट फार छान दिसते. हा प्रकार फार आधीपासून ट्रेंडींग आहे. नक्की वापरा.