1 / 7सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. लग्न म्हटलं की संगीत, हळद , रिसेप्शन अशा बऱ्याच गोष्टी असतात. लग्नापूर्वीच्या विधींसाठी आपण बऱ्यापैकी तयारी केलेली असते. पण प्रश्न उरतो तो लग्नानंतरच्या विधींचा. (Stylish Dresses for Wedding Reception)2 / 7जर आपल्यालाही लग्नानंतर रिसेप्शन पार्टीसाठी जायचे असेल तर या काही ट्रेण्डी ड्रेसने आपण आपल्या सौंदर्यात भर घालू शकतो. (Latest Trends for women's Reception Party Attire)3 / 7योक सिक्विन सूट हा आपल्या गोऱ्या रंगावर शोधून दिसेल. यासाठी लाल आणि सोनेरी रंगाच्या कॉम्बिनेशन फार सुंदर दिसेल. अनारकली कॅल्फ-लेंथ कुर्ती पार्टीमध्ये नवीन लूक देईल. यावर प्रिंटेड टेपिंग बॉर्डर असेल अशी ओढणी आपण निवडायला हवी. 4 / 7लग्नानंतर नववधुला अनेकदा पिवळा रंग घालायला सांगितला जातो. त्यासाठी आपण पिवळ्या रंगाचा बांधणी एम्ब्रॉडरी सूट आपण परिधान करु शकतो. स्टाईल करायचे झाल्यास आपण व्ही-नेक डिजाइन केलेला त्याच रंगाचा कुर्ता आणि पायजामा घालू शकतो. यावर भरलेला प्रिंटेंड ओढणी घेऊ शकता. 5 / 7तुम्हाला पार्टीत उठून दिसायचे असेल तर पेस्टल चंदेरी सूट आपण घालू शकतो. यामध्ये आपण वी नेक असलेला कुर्ता आणि त्याच रंगाची पॅन्ट घातल्यास आपल्या लूकमध्ये भर पडेल. 6 / 7आपल्याला जर रिस्पेशन पार्टीत जायचं असेल तर वाइन रंग हा सगळ्यात उठून दिसू शकतो. यावर आपण सोनेरी रंगाचे भरतकाम केलेला लॉग कुर्ता, जरीच्या डिटेलिंगसह जुळणारी पॅन्ट आणि ओढणी छान दिसेल. 7 / 7बनासरी सूट हा सगळ्यात आकर्षक दिसणारा सूट आहे. जो लग्न समारंभात अधिक भारी दिसतो. गुलाबी आणि जांभाळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन सूटमध्ये व्ही-नेक, एम्ब्रॉयडरी केलेला असेल तुमच्या सौंदर्याला चार चांद लावेल.