Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बुगडी झाली नवी! पाहा नीडल इअरकफचा नवा ट्रेंड, पारंपरिक कपड्यांवर दिसते सुपरग्लॅमरस....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2025 17:27 IST

1 / 13
फॅशनच्या दुनियेत नेहमीच काहीतरी नवीन ट्रेंड येत असतो. पण पारंपरिकतेला मॉडर्न टच (Trendy Needle Ear Cuffs / Ear Rings) सोबत खास जोड देण्याची कला ही खूप कमी गोष्टींमध्ये दिसते. कानात बुगडी घालणे, हा आपल्या संस्कृतीचा आणि सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. बुगडीमुळे चेहऱ्याला एक वेगळीच शोभा येते आणि पारंपरिक लुक पूर्ण होतो.
2 / 13
बदलत्या काळानुसार, बुगडीला एक नवा, स्टायलिश आणि तरीही पारंपरिकतेचा (latest needle earcuffs designs) फील देणारा पर्याय उपलब्ध झाला आहे, ते म्हणजे 'नीडल ईअररिंग कफ्स' (Needle Earring Cuffs) आता बुगडीऐवजी नीडल ईअररिंग कफ (Needle Ear Cuff) घालण्याचा नवा ट्रेंड फारच लोकप्रिय होत आहे.
3 / 13
आकर्षक, यूनिक, हलके वजनाचे आणि कानाला वेगळेपण देणारे हे इअरकफ कोणत्याही एथनिक किंवा पारंपरिक लूकला एकदम रॉयल आणि मॉडर्न टच देतात.
4 / 13
नीडल ईअररिंग कफ्स हे कानातले डिझाईन्स बुगडीइतकेच सुंदर आणि आकर्षक दिसतात, पण त्यांची स्टाईल अधिक मॉडर्न आणि हटके असते. हे तुम्हाला पारंपरिकतेचा अनुभव देण्यासोबतच एक क्लासी आणि ट्रेंडी लुक देतात.
5 / 13
आता जुन्या बुगड्यांच्या ऐवजी, तुम्ही या नीडल ईअररिंग कफ्सच्या मदतीने तुमच्या पारंपरिक पोषाखाला एक नवा आणि स्टायलिश ट्विस्ट देऊ शकता.
6 / 13
हे कानातले डिझाईन्स तुमच्या सौंदर्यात भर टाकून तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा वेगळे आणि आकर्षक बनवतील.
7 / 13
लग्न, सण, पारंपरिक कार्यक्रम किंवा प्रत्येक खास प्रसंगासाठी नीडल ईअररिंग कफ हा एक परफेक्ट पर्याय आहे. त्यामुळे झुमके, बुगडी किंवा मोठमोठे जड दागिने न घालता देखील तुम्ही सुंदर आणि ग्रेसफुल दिसू शकता.
8 / 13
नीडल ईअररिंग कफ मोत्यांनी आणि चमकदार स्टोन्सनी सजवलेले असतात, जे तुम्हाला रॉयल आणि एलिगंट लुक देतात. पार्टीवेअर किंवा खास प्रसंगांसाठी हे उत्तम पर्याय आहेत. `
9 / 13
मोरपंखी डिझाईन असलेले नीडल कफ पारंपरिक भारतीय अलंकारांना एक आधुनिक टच देतात. हे तुमच्या एथनिक लुकला चार चाँद लावतात. `
10 / 13
गोल्डन पारंपरिक डिझाईन्स असलेले हे क्लासिक नीडल कफ कोणत्याही पारंपरिक साडी किंवा लेहेंग्यावर खूप सुंदर दिसतात. यांची डिझाईन साधी पण आकर्षक असते.
11 / 13
जर तुम्हांला रंगीबेरंगी कुंदन वर्क आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कुंदन वर्क असणारे ट्रेंडी नीडल एअरकफ एअररिंग घालू शकता.
12 / 13
नऊवारी साडीवर पारंपरिक मराठमोळा लूक हवा असेल तर आपण अशा प्रकारचे चंद्रकोर असलेले पारंपरिक नीडल एअरकफ नक्की घालून आपल्या लुकला एका खास रॉयल टच देऊ शकता.
13 / 13
पारंपरिक डिझाईन्समध्ये कलश, मोरपंखी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर, रेखीव डिझाईन्स पाहायला मिळतील.
टॅग्स : फॅशनशुभविवाहस्टायलिंग टिप्स