Join us

गौरी-गणपतीच्या आगमनासाठी स्टायलिश ५ ड्रेस! घागराचोली, अनारकली झाले जुने-पाहा नवीन पॅटर्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 22:14 IST

1 / 9
गौरी - गणपतीचा सण म्हणजे अगदी सगळीकडे आनंद, उत्साह असतो. गौराई आणि गणपती बाप्पांच्या आगमनासाठी प्रत्येक जण पारंपरिक पेहरावात (Trending Festival Outfit Ideas for Ladies) नटून - थटून तयार असतात. यातही विशेष म्हणजे महिला वर्ग वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख घालूंन गौराई आणि गणपती बाप्पांच्या आगमनाला खास तयार होतात.
2 / 9
या खास प्रसंगी स्त्रिया पारंपरिक घागरा-चोली, साड्या किंवा ( Festival outfit ideas for women) अनारकलीसारखे कॉमन ड्रेस घालतात, पण आता ट्रेंड बदलला आहे. पण दरवर्षी तोच तोच घागरा, चोली किंवा अनारकरी, साड्या, पंजाबी सूट घालून कंटाळा आला असेल आणि यंदा काहीतरी नवीन आणि हटके स्टाईल ट्राय करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीच काही बेस्ट पर्याय...
3 / 9
पारंपरिकतेला आधुनिक फॅशनची जोड देत काहीतरी हटके आणि स्टायलिश पेहराव निवडला, तर सणाचा लूक अधिक आकर्षक दिसतो.
4 / 9
आपण पाहूयात असे काही खास आणि हटके ड्रेस पॅटर्न, जे तुम्हाला या उत्सवात वेगळे आणि चारचौघीत उठावदार दिसायला मदत करतील.
5 / 9
पारंपरिक व ट्रॅडीशन प्रिंट्स असलेला जंपसूट छोटेखानी सण - समारंभासाठी अगदी बेस्ट आहे. यात पिंक, रस्टी शेड्स, ऑफ व्हाईट, यल्लो या शेड्स सणावाराला अगदी शोभून दिसतात. आपण गौराई व गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अशा प्रकारचे सुंदर असे इंडो - वेस्टर्न जंपसूट नक्की ट्राय करु शकता.
6 / 9
ट्रॅडीशन स्लिट कुर्ता हा कुर्त्याचा प्रकार एकदम कम्फर्टेबल आणि सणावाराला किंवा खास प्रसंगी अत्यंत सुंदर लूक देतो. या पॅटर्नचे ड्रेस दिसायला थोडेफार अनारकली सारखेच असतात, म्हणून याला अनारकलीची परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणता येईल. हाय स्लिट, फ्रंट स्लिट, साईड स्लिट कुर्तीज अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या स्लिट कुर्तीज तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
7 / 9
शॉर्ट लेंथचा पेप्लम टॉप आणि त्या खाली मस्त थ्री - फोर्थ किंवा फुल लेंथचा स्कर्ट हे फेस्टिव्ह सिझन साठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे. स्कर्ट प्लेन असेल तर अगदी उत्तम नसेल तर सिल्की फ्लोई प्लाझो तुम्हाला हटके आणि स्टायलिश लूक देतो.
8 / 9
वेगवेगळ्या पॅटर्नच्या को - ऑर्ड सेट्सची सध्या तुफान क्रेझ आहे. त्यामुळे फोर पीस को - ऑर्ड सेट, स्लिव्हलेस को - ऑर्ड सेट विथ लॉन्ग जॅकेट देखील आपण नक्की ट्राय करु शकता.
9 / 9
वॉटरफॉल कुर्तीज म्हणजे ज्याचे लेअर्स दिसतात अशा कुर्तीज. या कुर्तीज शॉर्ट आणि लॉन्ग अशा दोन्ही लेंथ मध्ये असतात. या कुर्तीज फ्लोई प्लाझोजवर मस्त उठून दिसतात.
टॅग्स : फॅशनस्टायलिंग टिप्सगणपती उत्सव २०२५महिला