1 / 9ब्लाऊजच्या डिझाइनमध्ये फक्त गळ्याचा भाग नाही तर बाह्यादेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. याच स्टाईलमुळे ब्लाऊजला डिझायनर लूक मिळतो. मग ती रोजच्या वापरातील साडी असो किंवा एखाद्या विशेष प्रसंगासाठी घेतलेली साडी. योग्य बाह्या आपल्या संपूर्ण लूक बदलू शकतात. (Bridal blouse sleeve designs 2026)2 / 9पाहूयात लग्नसराईसाठी ट्रेंडमध्ये असलेले लेटस्ट स्लीव्ह्ज ब्लाऊज पॅटर्नचे ७ युनिक डिझाइन्स (Unique sleeve designs for simple sarees)3 / 9आपल्याला काहीतरी रोमँटिक आणि वेगळे ट्राय करायचे असेल, तर बाह्यांवर हार्ट-शेप कोरून त्याभोवती नाजूक लेस किंवा मणी लावू शकता. हे डिझाईन दिसायला अतिशय मोहक आणि उठावदार दिसते. साध्या बाह्यांना डिझायनर लूक देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.4 / 9एखाद्या भरजरी किंवा सिल्क साडीसाठी फुलांच्या नक्षीच्या बाह्या अतिशय रॉयल दिसतात. यावर हाताने बनवलेले सुंदर गोंडे (Tassels), मोती आणि मण्यांचे काम केल्यास तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते. हे डिझाईन खास करून लग्नसमारंभासाठी परफेक्ट आहे.5 / 9बाह्यांच्या टोकाला किंवा मध्यभागी बो-आकार (Bow) तयार केल्याने हातांना एक स्टायलिश आणि मॉडर्न लूक मिळतो. या 'बो' च्या मध्यभागी आपण एखादा मोठा स्टोन किंवा मोत्याचा वापर करून त्याला अधिक आकर्षक बनवू शकता. पार्टी वेअर साड्यांवर हे डिझाईन खूप छान दिसते.6 / 9उन्हाळ्यात मोठ्या बाह्या नको असतील, तर हाफ-स्लीव्हज फॅन्सी डिझाईन नक्की ट्राय करा. यात बाह्यांच्या काठावर 'कटवर्क' करून तिथे मोत्यांचे छोटे झुमके लावल्यास ब्लाऊजला एक पारंपारिक पण डिझायनर टच मिळतो.7 / 9सध्या स्कॅलॉप कट वर्कची मोठी क्रेझ आहे. बाह्यांच्या बॉर्डरला अशा प्रकारचे कट दिल्याने ब्लाऊजला एक वेगळीच फिनिशिंग मिळते. हे डिझाईन नेटच्या किंवा काठपदर साडीच्या ब्लाऊजवर अतिशय सुंदर दिसते. 8 / 9आपण रोजच्या वापरासाठी सुती कॉटन ब्लाऊज शिवत असाल, तर साध्या पण स्टायलिश उभ्या किंवा आडव्या कटची नक्षी निवडा. ही डिझाईन दिसायला साधी असली तरी प्रोफेशनल आणि एलिगंट लूक देते. ऑफिस वेअर साड्यांसाठी हा प्रकार सर्वोत्तम आहे.9 / 9उन्हाळ्यासाठी कट-आउट स्लीव्हज अतिशय आरामदायी आणि ट्रेंडी आहेत. भरजरी भरतकाम केलेल्या ब्लाऊजमध्ये कोपर किंवा खांद्यापाशी दिलेले कट-आउट्स एक बोल्ड आणि मॉडर्न स्टेटमेंट तयार करतात. कोणत्याही साध्या साडीवर हा पॅटर्न उठून दिसतो.