1 / 7आईच्या कपाटात अशा काही साड्या असतात ज्या सहसा लग्न किंवा खास फंक्शनसाठी घातल्या जातात. त्यातीलच एक पैठणी. ही साडी जुनी झाली किंवा थोडी फाटली तरी तिची किंमत आणि त्यावरील भरजरी पदर नेहमीत मौल्यवान असतो. सध्या जुन्या साड्यांना नवा टच देऊन ड्रेस बनवण्याचे ट्रेंड सुरु आहे. यामुळे महागड्या बुटीकमध्ये खर्च न करता तुम्हाला एक युनिक आणि डिझायनर आऊटफिट मिळतो. (Old Paithani saree party wear dress)2 / 7पैठणीच्या काठांचा आणि पदराचा वापर केल्यास साधा ड्रेसदेखील राजेशाही वाटू लागतो. आपल्याही जुन्या पैठणीला काही नवीन टच द्यायचा असेल तर ५ ट्रेडिंग पॅटर्नचे ड्रेस शिवून पाहा. (Indo-Western dress from old saree)3 / 7साडीच्या पूर्ण पदराचा वापर करुन आपण लाँग घेरदार गाऊन शिवू शकतो. पैठणीचा पदर गाऊनच्या पुढच्या भागावर किंवा कमरेच्या बेल्टसाठी वापरल्यास त्याला रॉयल लूक मिळेल. 4 / 7जुन्या साडीच्या कळ्या जोडून आपण अनारकली ड्रेस शिकवू शकतो. हा ड्रेस कधीच फॅशनच्या बाहेर जात नाही. पैठणीचे मोठे काठ खालच्या बाजूला लावल्यास ड्रेस चांगला दिसतो. 5 / 7ऑफिस पार्टी किंवा छोट्या फंक्शनसाठी लूक हवा असेल तर पैठणीचा स्ट्रेट कुर्ता आणि त्यासोबत प्लेन सिल्कची पँट शिवू शकतो. कुर्त्याच्या स्लीव्ह्जवर पैठणीचे काठ खूप शोभून दिसतात. 6 / 7प्लेन स्कर्ट किंवा क्रॉप टॉपवर घालण्यासाठी पैठणीच्या पदराचे लाँग जॅकेट शिवून शकतो. हा एक उत्तम इंडो-वेस्टर्न पर्याय आहे. जो आपल्याला सुंदर लूक देईल. 7 / 7साडीचा आपण शरारा किंवा गरारा सेट शिवू शकतो.साडीच्या पदराचा आपल्याला छोटा टॉप शिवता येईल. तरुणींमध्ये हा पॅटर्न सध्या खूप लोकप्रिय आहे.