1 / 7सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. या सगळ्यात सर्वाधिक वेळा दुर्लक्ष केली जाणारी गोष्ट म्हणजे ब्रा घालण्याची योग्य पद्धत आणि योग्य साइज. अनेक महिलांना स्वत:ची ब्रा साइज माहित नसते. इतकेच नाही तर कोणत्या कपड्यांमध्ये कोणती ब्रा घालावी असा देखील त्यांचा प्रश्न असतो. चुकीच्या पद्धतीने घातल्यास आरोग्यावर परिणाम तर होतोच पण अनेकदा अस्वस्थ देखील वाटते. (Bra wearing rules)2 / 7आपल्या कपाटात ढीगभर ब्रा असण्यापेक्षा योग्य पद्धतीची आणि गरजेनुसार ब्रा निवडणं चांगलं असतं. सध्या ब्रा खरेदी करताना किंवा वापरताना हे ३ नियम लक्षात ठेवले तर आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. (How to choose the right bra)3 / 7रोज वापरत असलेली ब्रा ही आपल्याला अतिशय आरामदायी असते. घरी, ऑफिसमध्ये किंवा बाहेर आरामात आपण घालू शकतो. यात असणारे फॅब्रिक हलके, मऊ आणि श्वास घेता येणारे असते. 4 / 7व्यायाम, योगा किंवा धावणे यांसारख्या क्रियेसाठी आपण कायम स्पोर्ट्स ब्रा घालायला हवी. ज्यामुळे ब्रा आपल्या स्तनांना आधार देते. यामुळे स्तनांच्या ऊतीवर दाब पडू देत नाही. तसेच वेदना देखील होत नाही. 5 / 7पार्टी किंवा वेस्टर्न आउटफिट्ससोबत स्ट्रॅपी ब्रा विचित्र दिसते. त्याऐवजी आपण स्ट्रॅपलेस किंवा मल्टी-वे ब्रा ची निवड करु शकतो. 6 / 7ब्रेसियर निवडताना या ३ गोष्टी कायम लक्षात ठेवल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 7 / 7तसेच दर ६ ते ८ महिन्यांनी ब्रा बदलायला हवी. रोज एकच ब्रा घालून नका. ब्रा नेहमी हाताने धुवा आणि सावलीत वाळवा. ज्यामुळे दीर्घकाळ टिकते.