1 / 8शरीरानुसार कपडेही वेगवेगळे वापरणे महिलांना आवडते. प्रसंगानुसार काय घालावे काय नाही हे जसे ठरवतात तसेच आपल्या शरीराला कोणता रंग, पॅटर्न छान दिसेल याचाही महिला फार विचार करतात. 2 / 8प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते. रचना वेगळी असते. जो ड्रेस आणि रंग तुमच्या मैत्रिणीला अगदी सुंदर दिसतो त्यात तुम्हीही तशाच दिसाल असे नाही. दुसरा पॅटर्न किंवा रंग जास्त खुलून दिसेल. 3 / 8शरीराने जरा गुबगुबीत असलेल्या महिलांसाठी खास काही पॅटर्न आहेत जे अगदी सुंदर दिसतात. रोजच्या वापराचे टॉप्स आणि कुर्ते या पद्धतीचे विकत घ्या. अगदी मस्त दिसाल. 4 / 8बेली फॅट जास्त असेल तर हॉरीझॉन्टल लाइन्सचे टॉप घालू नका. त्यामुळे पोट आणखी जास्त दिसेल. त्या ऐवजी वर्टीकल लाइन्सवाले टॉप्स वापरा. त्यामध्ये पोट जास्त दिसत नाही. 5 / 8गळाबंद कपडे घातल्याने आपण बारीक दिसू असे अनेकांना वाटते. मात्र खरे तर असे कपडे जास्त घट्ट दिसतात. त्याऐवजी व्हीनेक चा गळा असलेले टॉप वापरावेत. 6 / 8दोन्ही बाजूनी बंद असणारे टॉप न घालता, व्ही कट असलेले टॉप्स वापरा. पोटाशी सैल बसतात. त्यामुळे असे टॉप्स नक्की वापरुन पाहा. 7 / 8कुर्ता किंवा टॉपचे हात अर्धे असतील तर दंड फार जाड दिसतो. त्यामुळे लांब हाताचे टॉप नक्की वापरुन पाहा. गुबगुबीत हात असतील तर असे टॉप छान दिसतात. 8 / 8छान सैल कपडे वापरा. पोटाशी अगदी घट्ट कपडे घालून सतत बॉडीशेपर घालणे रक्ताभिसरणावर परिणाम करते. त्यामुळे जबरदस्ती बारीक दिसण्याऐवजी आपल्याला छान दिसतील असे कपडे वापरावेत.