1 / 6साडी कितीही सुंदर असली तरी त्यासोबतचे ब्लाऊज जर चांगला नसेल तर साडीचा शो निघून जातो. त्यामुळे चांगल्या पॅटर्नचे ब्लाऊज नक्कीच वापरायला हवेत. सध्या असाच एक सुंदर पॅटर्न व्हायरल झाला आहे. 2 / 6तरुणींमध्ये सध्या बो नेक ब्लाऊजची क्रेझ सुरु आहे. सा प्रकार दिसायला फार सुंदर आहेच शिवाय वापरणेही कम्फर्टेबल आहे. असा रेडीमेड ब्लाऊजही मिळत किंवा तुम्ही शिवूनही घेऊ शकता. 3 / 6Bow-neck back हा ब्लाऊज प्रकार गेल्या काही महिन्यांपासून फॅशनमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. पारंपरिक साडी लूकला आधुनिक, नाजूक आणि स्टायलिश वळण देण्यामध्ये या डिझाइनचा मोठा भाग आहे. दिसायला साधा वाटणारा हा ब्लाऊज, मागच्या बाजूला असलेल्या बो-नॉटमुळे संपूर्ण लूक एकदम एलिगंट आणि आकर्षक करतो.4 / 6हा ब्लाऊज प्रकार ऑर्गेन्झा, सिल्क, बनारसी, पार्टीवेअर साड्या आणि मिनिमल प्रिंटेड साड्यां सोबत खूप छान दिसतो. प्लेन साडी आणि सोबत बो-बॅक ब्लाऊज हा तर साधे आणि सुंदर असे कॉम्बिनेशन आहे.5 / 6अनेक जणी सध्या रिसेप्शन किंवा प्री-वेडिंग शूटसाठी bow-back ब्लाऊज निवडतात. तो रोमँटिक आणि ग्रेसफुल लूक देतो. त्यामध्ये पाठ अगदी सुबक आणि सुंदर दिसते. त्यामुळे हा प्रकार नक्की वापरुन पाहा. 6 / 6दिसताना जरी असे वाटले की तो बो पटकन सुटू शकतो तर तसे घाबरण्याची गरज नाही. त्याची रचना अगदी चांगली असते. तो घट्ट बसतो आणि सुटत नाही. त्यामुळे बिनधास्त हा प्रकार वापरुन पाहा.