लग्नसोहळ्यात घालायला हवीच ठसठशीत 'टेम्पल ज्वेलरी, पाहा ८ सुंदर डिझाइन्स-घसघशीत दागिना डोळ्यात भरतो!
Updated:November 3, 2025 19:22 IST2025-03-20T09:10:50+5:302025-11-03T19:22:05+5:30

लग्नकार्यात आपण हेवी दागिने घालतोच. आता अशा पद्धतीचा एकच अगदी ठसठशीत दागिना घालण्याचा ट्रेण्ड आला आहे. हे दागिने टेम्पल ज्वेलरी म्हणून ओळखले जातात.
काही ठिकाणी या दागिन्यांना साऊथ ज्वेलरी म्हणूनही ओळखले जाते. कारण दक्षिणेकडे असे मोठे दागिने जास्त प्रमाणात घातले जातात.
या दागिन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय ठसठशीत असतात. शिवाय त्यांच्यावर लक्ष्मी, गणपती, बालाजी अशा देवांच्या मुर्तीसुद्धा असतात.
हे दागिने तुम्ही सोन्यातूनही घडवून घेऊ शकता किंवा मग ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्येही ते मिळतात.
हल्ली चांदीमध्येही अशा प्रकारच्या टेम्पल ज्वेलरीचे कित्येक वेगवेगळे प्रकार मिळतात.
टेम्पल ज्वेलरीमध्ये सध्या मंगळसूत्रही मिळत असून हल्लीच्या नववधूंना ते विशेष आवडत आहेत.
अशा प्रकारे मोत्यामध्येही टेम्पल ज्वेलरी मिळते...
असा ठसठशीत सुंदर दागिना गळ्यात असल्यावर नक्कीच कोणाचेही सौंदर्य अधिक खुलून दिसेल यात वाद नाही.