1 / 12'मंगळसूत्र' हा प्रत्येक विवाहित भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा ( Latest Temple Mangalsutra Collection) दागिना आहे. पारंपरिक डिझाइन्ससोबतच, आता मंगळसूत्राच्या डिझाइन्समध्ये अनेक आधुनिक आणि फॅशनेबल बदल पाहायला मिळतात. यापैकीच एक नवीन आणि लोकप्रिय ट्रेंड म्हणजे टेम्पल डिझाईन मंगळसूत्र.2 / 12टेम्पल डिझाईन मंगळसूत्रामध्ये भारतीय मंदिरांच्या कलाकुसरीचे (New Temple Design Mangalsutra Patterns) आणि पारंपरिक देव-देवतांच्या आकृतींचे नक्षीकाम असते. या डिझाइन्समुळे मंगळसूत्राला एक पारंपरिक पण तरीही आधुनिक लूक मिळतो. हे मंगळसूत्र तुम्ही पारंपरिक पोशाखांसोबत तसेच वेस्टर्न स्टाईलच्या कपड्यांवरही घालू शकता.3 / 12मंदिरातील शिल्पकलेतून प्रेरित झालेले हे डिझाईन्स आजकाल (Temple Jewellery Mangalsutra) प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरले आहेत.4 / 12टेम्पल डिझाईन मंगळसूत्रात, कोरलेल्या देवी-देवतांच्या आकृत्या, नाजूक मोती, कुंदन आणि रंगीत स्टोनने सजलेली ही मंगळसूत्र म्हणजे फक्त दागिना नसून सौंदर्य आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहेत.5 / 12टेम्पल डिझाईनची वेगवेगळ्या पॅटर्नची मंगळसूत्रे प्रत्येक प्रसंगी उठून दिसतात. घरातील एखादा खास प्रसंग असो किंवा सणवार प्रत्येक प्रसंगी तुम्हांला विशेष असा लूक हवा असेल तर आपण टेम्पल डिझाईनची वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र नक्की ट्राय करु शकतो. 6 / 12टेम्पल डिझाईन मंगळसूत्रांची खासियत म्हणजे त्यावरील बारीक आणि भरीव असे नक्षीकाम. काही डिझाईन्समध्ये लक्ष्मीदेवी, गणेशजी यांचे शिल्प तर काहींमध्ये कुंदन व पोल्की स्टोन्सची घडणावळ दिसते. हे मंगळसूत्रे फक्त रोजच्या वापरासाठीच नाही तर लग्नसमारंभ, सण-वारांसाठीही उत्तम पर्याय ठरतात.7 / 12टेम्पल डिझाईन मंगळसूत्रांमध्ये लक्ष्मीच पेंडंट असणाऱ्या बऱ्याच डिझाईन्स पाहायला मिळतात.8 / 12जर टेम्पल डिझाईन मंगळसूत्रांमध्ये जास्त हेव्ही किंवा खूपच भरीव असे मंगळसूत्र डिझाईन नको असल्यास आपण अशा प्रकारचे नाजूक पण रेखीव नक्षीकाम असणाऱ्या मंगळसूत्राची निवड करु शकतो. 9 / 12टेम्पल डिझाईन मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे एखादे सुंदर - भरीव व दिसताना फारच आकर्षक व रेखीव दिसणाऱ्या मंगळसूत्राची देखील निवड करु शकतो. 10 / 12टेम्पल डिझाईन मंगळसूत्रांमध्ये, आपण जितके वेगवेगळे पॅटर्न पाहू तितके कमीच आहेत. एक से बढकर एक टेम्पल डिझाईन असणाऱ्या या मंगळसूत्रांच्या पॅटर्नची भुरळचं पडते. 11 / 12टेम्पल डिझाईनचं असं एखादं भरीव, आकर्षक व ठसठशीत मंगळसूत्र घातलं तर इतर कोणत्याही दागिन्यांची गरजच भासणार नाही. डिझाईनचं असं एखादं भरीव, आकर्षक व ठसठशीत मंगळसूत्र घातलं तर इतर कोणत्याही दागिन्यांची गरजच भासणार नाही. 12 / 12प्रत्येकीच्या मंगळसूत्रांच्या कलेक्शनमध्ये किमान एक तरी टेम्पल डिझाईन मंगळसूत्र असायला हवे, जे खास प्रसंगी तुम्हांला चारचौघीत अगदी उठून दिसण्यासाठी खास लूक देईल.