खास उन्हाळ्यासाठी.. लिनन साड्यांचे ७ स्टायलिश लूक- ऑफिसला जाताना नेसा- दिसाल एकदम स्मार्ट
Updated:February 28, 2026 15:20 IST2026-02-28T15:15:13+5:302026-02-28T15:20:21+5:30

उन्हाळा आता सुरू होत आहे. एकदा होळी झाली की मग उष्णता आणखी वाढते. अशावेळी अंगात अगदी हलकेफुलके सुती कपडे बरे वाटतात. म्हणूनच तर या दिवसांत कॉटन साड्या, लिनन साड्यांना जास्त मागणी असते.(summer special stylish look in linen saree)
लिनन साड्यांचा थाट काही वेगळाच असतो. कारण या साड्या अतिशय मऊ असतात (linen saree look). वजनालाही खूप हलक्या असतात. शिवाय या साड्यांमुळे स्मार्ट, आकर्षक लूक मिळतो.(beautiful look in linen saree for summer)
त्यामुळे यंदा उन्हाळ्यासाठी साड्या घेण्याचा विचार असेल तर अशा काही लिनन साड्यांचा विचार नक्की करा.
१२००- १३०० रुपयांपासून या साड्या मिळतात. शिवाय तुम्ही त्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.
ऑफिससाठीही या साड्या अतिशय क्लासी लूक देतात. एखाद्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी, प्रेझेंटेशनच्यावेळी अशी साडी जरुर नेसा. समोरच्यावर तुमची नक्कीच छाप पडेल.
उन्हाळ्यातल्या एखाद्या छोटेखानी कार्यक्रमासाठीही लिनन साडी अगदी परफेक्ट आहे.
ज्या महिला नेहमीच साड्या नेसतात, त्या उन्हाळ्यात घरात नेसायला अशाच छान लिनन साड्या घेतात. यामुळे तुम्ही घरातही अगदी नेटक्या आणि टापटीप दिसता.