1 / 10आता उन्हाळा सुरू झाला आहे. असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी चांगलंच उकडायला लागलं आहे.2 / 10आता काय सतत घाम आणि धूळ. कपड्यांची पार वाट लागून जाते. हिवाळी कपडे आता कपाटात ठेवून द्यायचे. ते वापरले तरी उकडून जीव गुदमरेल.3 / 10उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छान पातळ कॉटनचे कपडे घालायला हवेत. त्याचेच काही प्रकार जाणून घ्या. 4 / 10काही महिलांना अति घाम येतो. त्यामुळे फिकट रंगाच्या कपड्यांमधून आर-पार दिसायला लागते. अशा महिलांनी पातळ निळसर किंवा लालसर रंगाचे कपडे घाला. काळे कपडे घातल्याने आणखी जास्त उकडेल. एक माप मोठे कपडे वापरा.5 / 10तुम्ही कफ्तान या प्रकारा बद्दल ऐकले आहे का? हा फारच मोकळा-ढाकळा असा प्रकार आहे. दिसायलाही सुंदर दिसतो. हवा ही खेळती राहते. 6 / 10व्ही नेकचे साधे स्ट्रॅपवाले टीशर्टस आजकाल ट्रेंडमध्ये आहेत. आणि त्यांच्या स्टाईलमुळे त्यात उकडतही नाही. 7 / 10नी-लेन्थ वनपिस वापरा. ऑफिसला घालून जाण्यासाठी सोबर लुक देतात. तसेच खालून मोकळे असल्याने मांड्या काचत नाहीत. 8 / 10प्युअर कॉटनची शॉर्ट कुर्ती तर प्रत्येकीकडे असायलाच हवी. एकदम हलकी असते. कॉटनमुळे शरीरावर वळ उठत नाहीत. ऊन्हामुळे खाज सुटत नाही.9 / 10जिन्स वापरणं पूर्णपणे टाळा. घाम टाईट पॅन्टमध्ये साचून राहतो. आणि अनेक त्वचारोग होतात. त्यामुळे प्लाझो वापरा.10 / 10तसेच विविध कॉटन पॅन्ट आता बाजारात मिळतात, त्या वापरा. दिसतातही छान आणि असतातही अत्यंत कंम्फर्टेबल.