1 / 6उन्हाळ्यात कपडे निवडताना हलकं, हवेशीर आणि त्वचेला त्रास न देणारं कापड खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे टॉप्स घेताना आराम आणि स्टाइल दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. उन्हाळ्यात या ५ प्रकारांमध्ये फिकट रंगांचे टॉप्स निवडले तर उष्णता कमी जाणवते आणि लुकही अधिक फ्रेश दिसतो.2 / 6सर्वात आधी कॉटन कुर्ती टॉप हा प्रत्येकासाठी परफेक्ट पर्याय मानला जातो. कारण शुद्ध कॉटन कापड घाम पटकन शोषून घेतं, शरीराला थंडावा देतं आणि दिवसभर आरामदायी वाटतं. अशा टॉप्सची बाजारातील किंमत साधारण ३०० ते ८०० रुपये दरम्यान असते आणि ते ऑफिस - घर कुठेही सहज वापरता येतात.3 / 6रेयॉन फ्लेअर टॉप हा दुसरा छान पर्याय आहे, कारण रेयॉन कापड मऊ आणि फ्लोई असल्यामुळे टॉपला सुंदर फॉल येतो आणि तो घातल्यावर हलकं आणि स्टायलिश वाटतं, हा प्रकार आउटिंग किंवा छोट्या फंक्शनसाठी योग्य ठरतो आणि त्याची किंमत साधारण ४०० ते १००० रुपये पर्यंत असते.4 / 6लिनेन शर्ट टॉप सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि त्याचा क्लासी लुक लगेच उठून दिसतो, लिनेन कापड अत्यंत हवेशीर असल्यामुळे उष्णतेतही घाम कमी जाणवतो आणि शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे ऑफिस किंवा फॉर्मल लूकसाठी हा उत्तम पर्याय ठरतो, मात्र त्याची किंमत थोडी जास्त म्हणजे ८०० ते अगदी २००० रुपयांपर्यंत असू शकते.5 / 6उन्हाळ्यात कूल आणि ट्रेंडी दिसण्यासाठी स्लीव्हलेस क्रॉप टॉप देखील खूप आवडता पर्याय आहे, कारण त्यात बाह्या नसल्यामुळे उष्णता कमी जाणवते आणि हालचालही मोकळी होते. हे टॉप्स बहुतेक कॉटन किंवा कॉटन ब्लेंड कापडात मिळतात आणि त्यांची किंमत साधारण १५० ते ६०० दरम्यान असते.6 / 6शेवटी शिफॉन किंवा जॉर्जेट टॉप्स हे हलके, सुटसुटीत आणि थोडे एलिगंट लुक देणारे असल्यामुळे पार्टी किंवा खास प्रसंगांसाठी योग्य ठरतात, हे कापड हलकं असलं तरी थेट त्वचेवर घालण्याऐवजी लेयरिंगसह वापरलं तर अधिक आरामदायी वाटतं, आणि अशा टॉप्सची किंमत साधारण ५०० ते १५०० रुपये पर्यंत असते.