1 / 9शाहरुख खान व गौरी खान यांची लेक सुहाना खान ब्यूटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. अनेकांनी भूवया उंचावल्या, कुणी घराणेशाहीचे आरोप केले तर कुणाला वाटलं की शाहरुखची लेक इतकी मोठी झाली तर आपल्याला तारुण्यात वेड लावणाऱ्या शाहरुखसोबत आपणही वयस्कर व्हायला लागलो की काय. पण एक नक्की सुहाना कायम चर्चेत असते, ती आयपीएल पहायला जाते तेव्हाही चर्चेत असते आणि पार्ट्यातही(Suhana Khan Becomes The Brand Ambassador For Maybelline Ahead Of Debut).2 / 9 सुहाना खान ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर झाल्यावर लेकीचं कौतुक पाहून शाहरुख खानही भावूक झाला. तसं ट्विटही त्यानं केलं. लेकीचं कौतुक त्याच्या शब्दात दिसतं.3 / 9इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्टारकिड्सपैकी ती एक आहे. विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सुहाना दिसते. तिचे सोशल मीडिया चाहतेैही अनेक आहेत.4 / 9बॉलिवूड पदार्पणापूर्वीच एक मोठी संधी मिळाली आहे. आता ती सिनेमात कधी काम करणार, कोण तिला लाँच करणार याच्या चर्चा आहेत.5 / 9मुंबईत अंबानी स्कुलमध्ये तिने अभिनय प्रशिक्षण घेतले असून त्यानंतर लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये ती अभिनय प्रशिक्षण घ्यायला गेली होती. कोरोनाकाळात तिथे ती एकटीच राहत होती. दोन वर्षे तिने तिथं अभ्यासक्रम पूर्ण केला.6 / 9सुहाना बेली डान्स एक्सपर्ट आहे आणि संजना मुथरेजा यांच्याकडे तिनं प्रशिक्षण घेतलं आहे. 7 / 9सुहाना आणि तिची आई गौरी यांचं छान गुळपीठ आहे. मायलेकी एकमेकींविषयी भरभरुन बोलता असतात8 / 9नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'द आर्चीज' या चित्रपटातही सुहाना दिसणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.9 / 9मेबेलिनसारख्या ब्रॅण्डची ॲम्बॅसिडर झाल्यानं आता सुहाना ग्लॅमरच्या दुनियेतच करिअर करणार हे तर उघड आहे.