1 / 9उन्हाळ्यासोबतच लग्नसराईचा सिझन देखील सुरु होतो. अशावेळी लग्नाला (How to Pair Footwear with Indian Ethnic Wear for the Wedding Season) घालायचे कपडे, चपला आणि दागदागिने अशा इतर वस्तूंची खरेदी फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. कपड्यांची खरेदी झाल्यावर मग प्रश्न पडतो की, या कापड्यांना शोभून दिसतील असे, आणि पायांत घालूंन कम्फर्टेबल वावरता येईल असे बढिया फुटवेअर तर हवेच. 2 / 9 पण नेमकं साडी, लेहेंगा, शरारा, पंजाबी सूट अशा वेगवेगळ्या (Style Tips Ethnic Wear With These Footwear For Perfect Look) आऊटफिट्सवर कोणत्या प्रकारचे फुटवेअर पायात घालावे ते पाहूयात. 3 / 9एखाद्या खास प्रसंगी जर तुम्ही तुमच्या आऊटफिट्सला साजेसे असे फुटवेअर पायांत घातले, तर तुमचा लूक अधिकच सुंदर व आकर्षक दिसण्यास मदत होते. 4 / 9यासाठीच, यंदाच्या लग्नसराईसाठी जर तुम्ही कपड्यांना शोभून दिसतील असे फुटावेअर घेण्याचा विचार करत असाल, तर हे पर्याय पाहाच. 5 / 9जर तुम्ही साडी, पंजाबी सूट, धोती असा पारंपारिक लूक करणार असाल तर पायात जूतिया घाला. पारंपारिक पंजाबी सूट, धोती, कुर्ता, लेहेंग्यावर विशेषतः अशा धागा, मिरर वर्क केलेल्या जूतिया अधिक उठून दिसतात. अशा परिस्थितीत, पटियाला वर्क, मिरर वर्क, जरी किंवा एम्ब्रॉयडरी केलेल्या जूतिया घालून तुम्ही तुमचा लूक अधिक आकर्षक करु शकता. 6 / 9जर तुम्हाला लग्नसराईत पायांना आराम देण्यासाठी, कम्फर्टेबल लूक हवा असेल तर कोल्हापूरी चपला उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही फ्लॅट्स किंवा हिल्स अशा दोन्ही प्रकारच्या फुटवेअर घालू शकता. कोल्हापुरी फुटवेअरने तुमच्या लूकला देसी टच येईल. लांब कुर्ती किंवा एथनिक स्कर्टसोबत देखील या चपला अधिक सुंदर दिसतात. कोल्हापुरी चप्पल खरेदी करताना, लक्षात ठेवा की त्या बहुतेक तपकिरी रंगातच चांगल्या दिसतात. सध्या कोल्हापुरी चपलांवर धागा वर्क करण्याचा ट्रेंड देखील आहे. या ट्रेंडी कोल्हापुरी चपलां देखील अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. 7 / 9लग्न किंवा एखाद्या खास प्रसंगी तुम्ही पलाझो सूट किंवा अनारकली घालण्याचा विचार करत असाल तर त्यावर मोजडी अधिकच सुंदर दिसेल. तुम्ही प्लेन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वर्क केलेली मोजडी देखील घालू शकता. फ्लॅट्स किंवा हिल्स अशा दोन्ही प्रकारच्या मोजड्या तुमचा लूक अधिक उठून दिसण्यास मदत करतील. 8 / 9 जर तुम्ही शरारा - गरारा घालत असाल तर फ्लॅट फुटवेअर घालू नका. त्याऐवजी तुम्ही ब्लॉक हिल्स कॅरी करू शकता. ब्लॉक हिल्स खूप आरामदायी असतात, ज्यामुळे तुमचा लूक सुंदर दिसतो. 9 / 9 काहीजणींना प्रत्येक आऊटफिट्ससोबत हिल्स घालायला आवडतात. पण त्या जास्तवेळ हिल्स पायात घालूंन राहू शकत नाहीत, अशा परिस्थितीत, तुम्ही आऊटफिट्ससोबत वेजेस हिल्स घालू शकता. वेजेस घालायला खूप आरामदायी असतात आणि तुम्हाला क्लासी लूक देखील देतात. याचे हिल्स थोडे पसरट आणि रुंद असल्याने दीर्घकाळ हिल्स घालूंन देखील पाय दुखत नाहीत.