1 / 7१. 'दृश्यम २' फेम अभिनेत्री श्रिया सरन हिच्या स्टनिंग लूकची सोशल मिडियावर सध्या चांगलीच चर्चा आहे. श्रियाचे काही फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले असून त्या फोटोंमधले तिचे साडी लूक चांगलेच गाजत आहेत.2 / 7२. श्रियाने नेसलेली ही सिक्विन साडी एखाद्या पार्टीसाठी किंवा रिसेप्शनसाठी परफेक्ट लूक देणारी आहेत. साडीवर खूप हेवी वर्क असल्याने त्यावर सिंपल ज्वेलरीही शोभून दिसेल.3 / 7३. साडीवर बेल्ट लावण्याची सध्या प्रचंड क्रेझ आहे. अशा पद्धतीची साडी तुम्हाला नक्कीच एक स्टायलिश लूक देते. श्रियाची ही साडी फॅशन डिझायनर आनंद काबरा यांनी डिझाईन केली आहे. 4 / 7४. एरवी लग्न समारंभात आपण गडद रंगाच्या साड्या नेसण्यास प्राधान्य देतो. पण अशा मोतिया, पांढऱ्या आणि फिक्या रंगाच्या हेवी वर्क असणाऱ्या साड्याही तेवढ्याच शोभून दिसतात. 5 / 7५. श्रियाने नेसलेली ही साडी कविता गुट्टा यांनी डिझाईन केली आहे. डिझायनर प्रकारात मोडणारी ही साडी सिल्कची असून त्यावर चंदेरी बुट्टी आहे. तसेच साडीच्या ब्लाऊजवर आकर्षक एम्ब्रॉयडरी केलेली आहे.6 / 7६. अशा पद्धतीच्या लालसर ब्राईट रंगातल्या साड्या घेण्याचं अनेकजणी टाळतात. पण त्याच्यावरचा मेकअप आणि दागिन्यांची निवड परफेक्ट जमली तर अशा रंगाच्या साड्याही केवढ्या सुंदर दिसतात, हेच श्रियाच्या या लूकवरून दिसून येतं. श्रियाची ही साडी जयंती रेड्डी यांनी डिझाईन केली असून त्यावर चंदेरी धाग्याने वर्क करण्यात आलं आहे.7 / 7७. श्रियाने नेसलेली ही साडी बनारसी असून त्यावर जरदोसी वर्क करण्यात आलं आहे. साडीच्या ब्लाऊजवर आणि बेल्टवरही जरदोसी वर्क दिसून येतं. तिची ही साडीही जयंती रेड्डी यांच्याच कलेक्शनमधली आहे.