1 / 8सध्याच्या काळात कपल्समध्ये ट्विनिंग किंवा मॅचिंग कपड्यांची मोठी क्रेझ आहे. लग्नसमारंभ असो, साखरपुडा किंवा इतर कोणताही खास प्रसंग असो अनेक कपल्सला मॅचिंग आउटफिट कॅरी करण्याची हौस असते.(Couple matching outfits)2 / 8लग्नसमारंभात दाक्षिणात्य पेहरावाचा एक वेगळाच थाट असतो. आपल्याला या वेळी साडी नेसणे कठीण वाटत असेल, पण साडीचा लूक हवा असेल, तर हे अनारकली स्टाईल साडी ड्रेस आपल्यासाठी चांगला पर्याय ठरेल. यामध्ये कपल्स कॉम्बिनेशन देखील सुंदर करता येते. इतकंच नाही तर हे १५५० रुपयांत मिळते. (Matching dress and shirt for couples) 3 / 8लग्न कार्य किंवा संध्याकाळच्या रिसप्शेनसाठी वाइन किंवा मरुन रंग हा चांगला दिसतो. कपल्ससाठी हा रंग अधिक उठून दिसतो. 4 / 8जर आपल्याला पारंपरिक आणि आधुनिक स्टाइल करायच असेल तर गडद जांभळ्या रंगाचे कपडे स्टाइल करु शकता. 5 / 8पोपटी रंगाचा ड्रेस आणि त्यावर मुलांसाठी पोपटी रंगाचा शर्ट हा पारंपरिक आणि ग्रेसफुल लूक देतो.6 / 8मस्टर्ड यलो रंग हा दक्षिण भारतीय फॅशनची खरी ओळख सांगणारा रंगसंगम. सणासुदीला हा लूक खास उठून दिसतो.7 / 8आधुनिक आणि सॉफ्ट लूक देणारा पर्याय नारंगी रंग. लग्न कार्यात किंवा सणसमारंभात हा रंग अधिक छान दिसतो. 8 / 8डॅशिंग आणि प्रोफेशनल कपल लूकसाठी नेव्ही ब्लू रंग अधिक छान आणि उठून दिसतो.