1 / 7साऊथ इंडियन दागिन्यांची खासियत वेगळी असते. विशेषतः दाक्षिणात्य मंगळसूत्र, ज्याला 'थाली' किंवा 'मांगल्याम' म्हटले जाते, ते आपल्या अस्सल पारंपारिक घडणीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मराठमोळ्या मंगळसूत्रात काळ्या मण्यांना महत्त्व असते, तर साऊथ इंडियन डिझाइन्समध्ये सोन्याचे कोरीव काम, पवित्र चिन्हे आणि कलाकुसरीवर अधिक भर दिला जातो.2 / 7केवळ लग्नविधीचा एक भाग म्हणून नाही, तर एक 'रॉयल फॅशन स्टेटमेंट' म्हणून आजची तरुण पिढी या दाक्षिणात्य डिझाइन्सकडे आकर्षित होत आहे. पाहूयात साऊथ इंडियन मंगळसूत्राचे ५ प्रकार जे आपल्या सौंदर्याला चार चाँद लावतील.3 / 7एलै थाली हे सर्वात जुने आणि पारंपरिक डिझाइन आहे. एलै म्हणजे पान. या मंगळसूत्रात सोन्याचे एक पान असते. ज्यावर विष्णू किंवा शंकराचे चिन्ह असते. दिसायला अतिशय साधे पण अत्यंत सुंदर असतं. 4 / 7थालीपुट्टू या प्रकारच्या मंगळसूत्रात सोन्याच्या चैनमध्ये मणी किंवा डिझाइन असतं. यावर कोरीव काम केलेले असते. रोज वापरण्यासाठी हे मंगळसूत्र चांगलं असतं. 5 / 7ज्या महिलांना देवीची भक्ती किंवा कोरीव काम आवडते, त्याच्यासाठी मिनाक्षी थाली हे डिझाइन चांगले आहे. यात कमळाचे फूल, देवीची प्रतिमा कोरलेली असते. यात रुबी आणि पाचूचा वापर केला जातो. 6 / 7मुगूप्पु हे डिझाइन सध्या फॅशन ट्रेंडमध्ये आहे. साऊथ इंडियन मंगळसूत्रात चैनच्या एका बाजूला एक मोठा पेंडंट जोडलेला असतो. हे पेंडंट गोल किंवा मोराच्या आकाराचे असते. यात केंपू स्टोन किंवा हिऱ्यांचा वापर केला जातो.7 / 7आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बोटू डिझाइन प्रसिद्ध आहे. हे सोन्याच्या दोन छोट्या चकत्यांसारखे असते. लग्नात हे पिवळ्या दोऱ्यात बांधले जाते आणि नंतर सोन्याच्या चैनमध्ये ओवले जाते.